'तुझं लफडं सगळ्यांना सांगू' 16 वर्षीय मुलीवर 5 जणांचा सामूहिक अत्याचार, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका १६ वर्षीय मुलीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे.
संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती: अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका १६ वर्षीय मुलीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित मुलीचं अफेअर घरी सांगण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली, यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली होती. येथील एका १६ वर्षीय मुलीचं तिच्याच गावातील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती आरोपींना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत होते. तुझं मुलासोबत लफडं सुरू आहे. याची आम्हाला माहिती आहे, तुझी बदनामी करू, अशी धमकी आरोपी पीडित मुलीला देत होते.
advertisement
बदनामीच्या भीतीने तरुणीने याबाबत कुणालाही सांगितलं नाही. याचाच फायदा नराधमांनी घेतला. पाच जणांनी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी सामूहिक अत्याचारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी सर्व पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पण एका १६ वर्षीय मुलीवर अशाप्रकारे सामूहिक अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित मुलीच्या कुटुबीयांकडून केली जात आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 10:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तुझं लफडं सगळ्यांना सांगू' 16 वर्षीय मुलीवर 5 जणांचा सामूहिक अत्याचार, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!







