धनुभाऊच गोपीनाथ मुंडेंचे वारसदार, भरसभेत भुजबळ बोलून गेले; 35 मिनिटाच्या भाषणात पंकजाताईंचा टाळला उल्लेख

Last Updated:

ओबीसी बांधवांना संबोधित करत असताना त्यांनी भाषणात पंकजा मुंडे यांचा उल्लेखही टाळल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे

News18
News18
बीड :  गोपीनाथ मुंडे हे भाजपातला ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जात होते. त्यांनी महाराष्ट्रात भाजपा हा पक्ष मोठा करण्यात मोलाचा वाटा आहे. आज भाजपाला भक्कम साथ देणाऱ्या ओबीसी समाजात पक्ष रुजवण्यात गोपीनाथ मुंडे यांचे कष्ट कारणीभूत आहेत. मुंडे यांचे पुतणे धनंजय यांचाही राजकीय प्रवास काकांसारखाच संघर्षाचा राहिला आहे. गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून एकेकाळी त्यांच्याकडं पाहिलं जात असे.  आज पुन्हा हा उल्लेख मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यात केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवलेल्या पाहायला मिळाल्या.
मराठा आरक्षणासंदर्भातल्या जीआरच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या ओबीसींचा महाएल्गार मेळावा बीडमध्ये पार पडला. ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून भुजबळ यांनी गोपीनाथराव मुंडे यांचा वारस म्हणून धनंजय मुंडे यांचा उल्लेख केली. ओबीसी बांधवांना संबोधित करत असताना त्यांनी भाषणात पंकजा मुंडे यांचा उल्लेखही टाळल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तर ओबीसी चळवळ हातात घेण्याचे
advertisement
आवाहन केले आहे. तसेच गोपीनाथ मुंडे सारखे तुम्ही प्रत्येकाच्या हृदयात जाल, असेही भुजबळ म्हणाले.

पंकजा मुंडे यांचा उल्लेख टाळला

हे गोरगरीब लाखो लोक आशेने बघत आहेत... गोपीनाथराव मुंडे यांचे तुम्ही वारसदार आहेत... हे काम तुम्ही घ्या..गोपीनाथराव मुंडेंसारखे सर्वांच्या हृदयात तुम्ही जाऊन बसू शकता, छगन भुजबळ यांनी मुंडेंचा वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत ओबीसी चळवळ हातात घेण्याचे आवाहन केले तर संपूर्ण भाषणात पंकजा मुंडे यांचा उल्लेख टाळला, यावरून मोठी चर्चा होत आहे.
advertisement

मेळाव्यातून  धनंजय मुंडे यांना प्रमोट केल्याची चर्चा

पुढे बोलताना गोपीनाथराव मुंडे यांचे तुम्ही वारसदार .. हे तुम्ही काम घ्या हे काम मोठं आहे. मंत्रिपदाच्या आमदारकीच्या खुर्च्या या वळवा वरच पाणी आहे.. गोपीनाथराव मुंडेंसारखे सर्वांच्या हृदयात तुम्ही जाऊन बसू शकता... या गोरगरिबांचे रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आल्याशिवाय राहणार नाही. या संपूर्ण ओबीसी मेळाव्यातून माजी मंत्री धनंजय मुंडे यांना प्रमोट केल्याचे दिसून आले.
advertisement

भुजबळांची जरांगेवर टीका

आता गप्प बसणार नाही, ओबीसी आरक्षणासाठी कोर्ट आणि रस्त्यावर दुहेरी लढा लढू असा इशारा छगन भुजबळांनी दिला. राज्यभरातून ओबीसी समाज बांधव मेळाव्यासाठी जमले होते. मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. आरक्षण सामाजिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहे. तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असे भुजबळ म्हणाले. यावेळी बोलताना भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील टीका केली. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला अशी टीका भुजबळ यांनी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनुभाऊच गोपीनाथ मुंडेंचे वारसदार, भरसभेत भुजबळ बोलून गेले; 35 मिनिटाच्या भाषणात पंकजाताईंचा टाळला उल्लेख
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement