advertisement

नाशिककर लक्ष द्या! पाणी आताच भरून ठेवा, आठवडाभर खोळंबा होणार, कधी आणि कुठं?

Last Updated:

Nashik Water Supply: पाणीपुरवठा बंद राहणार नसला तरी दाब कमी असेल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिककर लक्ष द्या! पाणी आताच भरून ठेवा, आठवडाभर पुरवठ्याचा खोळंबा, कारण काय?
नाशिककर लक्ष द्या! पाणी आताच भरून ठेवा, आठवडाभर पुरवठ्याचा खोळंबा, कारण काय?
नाशिक: नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिडको विभागातील प्रभाग क्रमांक 29 मधील पवननगर जलकुंभाच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे महत्त्वपूर्ण काम सोमवारपासून (दि. 16) हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत पर्यायी व्यवस्थेतून पाणीपुरवठा केला जाणार असल्याने, सिडकोतील तीन प्रभागांमध्ये 16 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
नेमके कारण काय?
जलकुंभाच्या आतील भागाची दुरुस्ती आणि स्ट्रक्चरल मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. हे काम सुरू असताना जलकुंभाचा वापर करता येणार नाही. परिणामी, पाणीपुरवठा थेट मुख्य जलवाहिनीवरून करावा लागणार आहे. पाइपलाइनमधून थेट पाणी सोडल्यामुळे त्याचा दाब कमी राहणार आहे.
advertisement
या भागांत पाणीपुरवठा विस्कळीत
पुढील परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळणार आहे:
प्रभाग 24: तिडके नगर, प्रियांका नगर पार्क, कालिका पार्क, सिद्धेश्वर मंदिर, जगतापनगर व परिसर.
प्रभाग 25: पवननगर, उंटवाडी, रायगड चौक, शनि मंदिर, उदय कॉलनी, श्रीरामनगर, भाजी मार्केट परिसर, आदर्श फ्लॅट सिस्टिम, भापकर फ्लॅट.
प्रभाग 28: उमा पार्क, शुभम पार्क, रामेश्वर नगर, इप्को कॉलनी, बंदावणे नगर, कमल नगर.
advertisement
प्रभाग 29: लोकमान्य नगर, राजरत्ननगर, महाकाली चौक, आनंद नगर, तोरणा नगर.
महापालिकेचे आवाहन
पाणीपुरवठा बंद राहणार नसला तरी दाब कमी असेल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिककर लक्ष द्या! पाणी आताच भरून ठेवा, आठवडाभर खोळंबा होणार, कधी आणि कुठं?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement