advertisement

लग्नाच्या तगाद्याने सोडलं घर, जंगलात जाऊन बनला 'टार्जन', झाडपाला खाऊन जगतोय जीवन, पाहा VIDEO

Last Updated:

घरी लग्न करण्यासाठी तगादा लावल्याने काय होऊ शकतं, याचं एक जीवंत उदाहरण समोर आलं आहे. घरी लग्नाचा तगादा लावल्याने एका तरुणाने चक्क घर सोडलं आहे.

News18
News18
घरी लग्न करण्यासाठी तगादा लावल्याने काय होऊ शकतं, याचं एक जीवंत उदाहरण समोर आलं आहे. घरी लग्नाचा तगादा लावल्याने एका तरुणाने चक्क घर सोडलं आहे. तो मागील दहा वर्षांपासून जंगलात जाऊन राहत आहे. विशेष म्हणजे जंगलात अन्नाची कमतरता असल्याने तो चक्क वेगवेगळ्या झाडांचा पाला खाऊन आयुष्य जगत आहे. धक्कादायक बाब म्हणजे झाडपाला खाऊन देखील त्याची तब्येत ठणठणीत आहे.
ही घटना कर्नाटमधील बेळगाव जिल्ह्यातील आहे. इथं एका तरुणाने गेल्या दहा वर्षांपासून अन्नाचा त्याग करून केवळ झाडांचा पाला खाऊन जगण्याचा मार्ग स्वीकारला आहे. डोंगरावर राहून प्राण्यांप्रमाणे जीवन जगणाऱ्या या 'आधुनिक टार्जन'ची ही जीवनशैली सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
सौदत्ती तालुक्यातील उगरगोळ गावातील बुडन खान होसमनी असं या ३४ वर्षीय युवकाचं नाव आहे. या तरुणाने वैद्यकीय विश्वापुढे मोठं कोडं निर्माण केलं आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्याने अन्नाकडे पाठ फिरवली असून, तो केवळ झाडांचा पाला खाऊन जगत आहे. गावाबाहेरील हेग्गोळ नावाच्या डोंगराळ भागात तो एकांतात राहतो. झाडांचा पाला खाऊनही त्याची प्रकृती उत्तम असल्याने स्थानिक नागरिक त्याला 'आधुनिक टार्जन' म्हणून ओळखतात.
advertisement
दहा वर्षांपूर्वी लग्नासाठी घरच्यांनी तगादा लावल्याने बुडन खानने घर सोडून डोंगराचा आश्रय घेतला होता. तेथे वानरांना झाडांचा पाला खाताना पाहून त्यानेही हीच सवय लावून घेतली. दररोज सकाळी झाडांचा पाला खाल्ल्यानंतर त्याचे पचन व्हावे म्हणून तो कठीण योगासने करतो. भूक लागली की वानरांप्रमाणे झाडावर चढून पाला खाणाऱ्या बुडन खानचे हे अजब वागणे सध्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरले आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
लग्नाच्या तगाद्याने सोडलं घर, जंगलात जाऊन बनला 'टार्जन', झाडपाला खाऊन जगतोय जीवन, पाहा VIDEO
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement