सोने-चांदी विसरा! या धातूने दिले 121% रिटर्न; गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट, पाहा काय आहे नवीन संधी?

Last Updated:

ज्यामुळे शेअर बाजारापेक्षा अधिक नफा मिळाला आहे. चांदीने या वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक केले आहेत. या गोंधळात एका धातूने शांतपणे भरघोस प्रगती केली आहे.

News18
News18
सध्या गुंतवणुकीच्या बाजारात सोने आणि चांदीच्या दरवाढीची जोरदार चर्चा सुरू आहे. या मौल्यवान धातूंनी गुंतवणूकदारांना यंदा चांगला परतावा दिला आहे, ज्यामुळे शेअर बाजारापेक्षा अधिक नफा मिळाला आहे. चांदीने या वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक केले आहेत. या गोंधळात एका धातूने शांतपणे भरघोस प्रगती केली आहे. हा धातू म्हणजे 'प्लॅटिनम'.
सोने-चांदीच्या शर्यतीत प्लॅटिनमने बाजी
सोने-चांदीच्या शर्यतीत प्लॅटिनमने बाजी मारली आहे. यंदाच्या वर्षात चांदीने 132% आणि सोन्याने 74% परतावा दिला आहे. प्लॅटिनमने कोणाच्याही लक्षात न येता तब्बल 121% ची वाढ नोंदवली आहे. वर्षाच्या सुरुवातीला प्रति 10 ग्रॅम 25,160 रुपये असलेला प्लॅटिनमचा भाव 19 डिसेंबरपर्यंत 55,350 रुपयांवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, ज्यांना सोने आणि चांदीत गुंतवणूक करण्याची संधी हुकली असे वाटते, त्यांच्यासाठी प्लॅटिनम हा एक प्रबळ पर्याय म्हणून समोर आला आहे.
advertisement
प्लॅटिनम हा केवळ दागिन्यांसाठी वापरला जाणारा धातू नाही, तर तो एक महत्त्वाचा औद्योगिक धातूही आहे. ऑटोमोटिव्ह उद्योगातील कॅटेलिटिक कन्व्हर्टर, इलेक्ट्रॉनिक्स, खते, वैद्यकीय उपकरणे आणि औषधनिर्माण क्षेत्रात याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामुळे जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही प्लॅटिनमची मागणी स्थिर राहण्यास मदत होते.
वर्ल्ड प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट कौन्सिलचा अहवाल काय सांगतो?
'वर्ल्ड प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट कौन्सिल' (WPIC) च्या अहवालानुसार, सध्या जागतिक बाजारपेठेत प्लॅटिनमच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने किमतींना मोठा आधार मिळत आहे. सप्टेंबर 2025 मध्ये प्लॅटिनमच्या किमतीने 2014 नंतर पहिल्यांदाच 1500 डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडला आणि त्यानंतर ती 1600 डॉलरच्याही वर गेली, जे या धातूच्या बाजारपेठेतील मजबुतीचे लक्षण आहे.
advertisement
प्रामुख्याने चार क्षेत्रातून प्लॅटिनमची एकूण मागणी 
ऑटोमोटिव्ह (39%), दागिने (28%), औद्योगिक वापर (24%) आणि गुंतवणूक (9%). 2025 मध्ये प्लॅटिनमची एकूण मागणी 7.88 दशलक्ष औंस राहण्याचा अंदाज आहे. जरी ही मागणी गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडी कमी असली, तरी पुरवठ्यातील अडथळे किमती स्थिर ठेवण्यास आणि वाढवण्यास मदत करत आहेत.
पांढऱ्या सोन्यावर नजरा खिळल्या
प्लॅटिनम आता जगातील तिसरा सर्वाधिक व्यवहार होणारा मौल्यवान धातू बनला आहे. दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा धातू 2026 मध्येही चांगली तेजी दाखवू शकतो, असा विश्वास बाजार तज्ज्ञांना आहे. सोन्याच्या तुलनेत प्लॅटिनमने यंदा अधिक चांगली वाढ दाखवल्यामुळे नवीन वर्षात गुंतवणूकदारांच्या नजरा या 'पांढऱ्या सोन्यावर' खिळल्या आहेत.
advertisement
डिस्क्लेमर: शेअर मार्केट, Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणत्याही नफ्या तोट्यासाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/मनी/
सोने-चांदी विसरा! या धातूने दिले 121% रिटर्न; गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट, पाहा काय आहे नवीन संधी?
Next Article
advertisement
Thackeray Alliance NCP Sharad Pawar: मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
  • BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट

  • महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युतीवर शिक्कामोर्तब केले असून दुसरीकडे राष्ट्र

  • ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीतला पेच कुठं अडलाय याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement