वेस्टर्न डिस्टरबन्समुळे उत्तर भारतात हवामानाचा यू-टर्न! थंडी गेली पण पावसाने धास्ती वाढवली
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई, कोकण, पुणे, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये तापमान वाढले आहे. वेस्टर्न डिस्टरबेंसमुळे १७ ते १९ फेब्रुवारीला पावसाची शक्यता असून हवामानात मोठा बदल होणार आहे.
मुंबई: देशभरात अनेक भागांमध्ये हवापालट झालं आहे. एकीकडे वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झालं आहे. हवेची दिशा बदलली आहे. त्यामुळे पंजाब, राजस्थानकडून उष्ण वारे येत आहेत. दक्षिण पूर्व वारे सुटले आहेत. त्याचा परिणाम होत असून तापमान वाढ झाली आहे. थंडीच्या काळ मागच्या काही वर्षांपासून कमी होत चालला आहे. हवामानाचा हा बदलेला पॅटर्न पाहता, उष्ण वातावरण जास्त काळ राहात आहे.
स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या तीन चार दिवसांपासून दिवसभर कमालीची उष्णता आणि पहाटे गारवा जाणवत आहे. अचानक हवापालट झाल्याने त्याचा त्रास होऊ लागला आहे. कोकण पट्ट्यात मे महिन्यासारख्या उन्हाच्या झळा बसत आहेत. उत्तर भारतात सध्या थंडी ओसरून उन्हाचा चटका जाणवू लागला असला, तरी हवामान खात्याने दिलेला नवा अंदाज बळीराजाची चिंता वाढवणारा आहे. सलग येणाऱ्या 'वेस्टर्न डिस्टरबेंस'मुळे पुढील आठवड्यात उत्तर आणि मध्य भारतात पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
कोकणात कसं राहील हवामान?
आज मुंबईसह परिसरात थंडी जवळपास पूर्णपणे नाहीशी झाली आहे. सकाळी फारसा गारवा जाणवणार नाही आणि दुपारी उकाडा जाणवेल. हवामान कोरडे आणि निरभ्र राहील. कमाल तापमान सुमारे 32 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पुढील काही दिवसांतही उष्णतेची तीव्रता अशीच राहणार आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि आसपासच्या भागांमध्ये सकाळी थोडा गारवा जाणवेल, मात्र दुपारी सूर्यप्रकाशामुळे वातावरण चांगलेच तापलेले राहील. कालच्या तुलनेत आज तापमान अधिक राहील. कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
नेमकं काय घडतंय हवामानात?
सध्या डोंगराळ भागात एक 'वेस्टर्न डिस्टरबेंस' सक्रिय आहे, ज्याचा परिणाम म्हणून राजस्थान आणि पंजाबच्या वर चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे वाऱ्यांची दिशा बदलली असून दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. ही उष्णता येणाऱ्या वादळाचे संकेत मानले जात आहेत. महाराष्ट्रावर पुन्हा ढगाळ हवामान आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
१७ ते १९ फेब्रुवारी: धोक्याची घंटा!
हवामान तज्ज्ञांच्या मते, १६ फेब्रुवारीच्या रात्रीपासून हवामानात मोठा बदल होईल. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे १७ आणि १८ फेब्रुवारीला पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे. १८ आणि १९ फेब्रुवारीला हा पाऊस उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागाकडे सरकेल.त्यामुळे महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक पाऊस किंवा अंशत: ढगाळ हवामान राहील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 7:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
वेस्टर्न डिस्टरबन्समुळे उत्तर भारतात हवामानाचा यू-टर्न! थंडी गेली पण पावसाने धास्ती वाढवली







