Health Tips: 'या' सुगंधित पानांमध्ये लपलाय गंभीर आजारांवरील उपचार, कॅन्सरची रिस्कही करते कमी; वाचा 10 फायदे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Bay Leaf Health Benefits: तमालपत्र जवळजवळ प्रत्येक घरात वापरले जाते. ही एक प्रकारची सुगंधी औषधी वनस्पती आहे, जी अन्नाची चव आणि सुगंध वाढवते. हिरवी तमालपत्र वाळवली जाते आणि मसाला म्हणून वापरली जाते. पुलाव, बिर्याणी, भाज्या, मांसाहारी पदार्थ अशा अनेक पदार्थांमध्ये तमालपत्र मिसळले जाते. तमालपत्र, अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि फायबरने भरपूर आहे. तसंच संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हेल्थलाइनच्या मते, अनेक संशोधनांमध्ये त्याचे असंख्य फायदे समोर आलेय. तमालपत्राचे काय फायदे आहेत, ते येथे जाणून घेऊया.
कॅन्सरपासून संरक्षण- तमालपत्रात असलेले काही घटक तुमच्या शरीराला धोकादायक कर्करोगापासून वाचवतात हे तुम्हाला माहीत आहे का? हेल्थलाइनच्या मते, काही रिसर्चमधून दिसून आलेय की, तमालपत्र ब्रेस्ट आणि कोलोरेक्टल कॅन्सर पेशी वाढण्यापासून रोखू शकते. तसंच, यावर अजून संशोधन चालू आहे. तरीही, आपण आपल्या आहारात नियमितपणे याचा समावेश केल्यास, आपण हा प्राणघातक रोग होण्याचा धोका कमी करू शकता.
advertisement
मधुमेह नियंत्रित करा- दररोज तुमच्या आहारात तमालपत्राचा समावेश केल्यास मधुमेहावर सहज नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाच्या रूग्णांमध्ये ग्लुकोजची लेव्हल आणि कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रित आणि कमी करण्यासाठी हे प्रभावी आहे. हे शक्य आहे कारण तमालपत्रात पॉलीफेनॉल असते, जो एक प्रकारचा शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. तसंच, मधुमेहामध्ये काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
advertisement
advertisement
किडनी स्टोनपासून बचाव - तुम्ही त्याचा नियमित वापर करत असल्यास तमालपत्रामुळे मुतखड्याचा धोकाही कमी होतो. इतर कोणत्याही पारंपारिक औषधी वनस्पतींपेक्षा शरीरातील युरियाचे प्रमाण कमी करण्यात ते अधिक प्रभावी आहे. युरिया हे एक एंजाइम आहे जे शरीरात संतुलन बिघडल्यास किडनी स्टोनसह अनेक जठरासंबंधी विकार होऊ शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चांगली झोप मिळविण्यासाठी प्रभावी - याची सूदिंग प्रॉपर्टीज चांगली झोप मिळवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. रात्री झोपण्यापूर्वी तमालपत्र चहा किंवा काढा प्यायल्यास झोप लवकर आणि गाढ येते. तमालपत्र एक सौम्य शांतता म्हणून कार्य करते, जे सेंट्रल नर्वस सिस्टम दुरुस्त करते. यामुळे चिंता आणि तणाव कमी होतो. आराम मिळतो. तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तेव्हा तुम्ही तमालपत्राच्या अर्काचे काही थेंब पाण्यात मिसळून त्याचे सेवन करू शकता.
advertisement


