How To Store Mango : सिझन संपल्यानंतरही आंबा खायचाय? अशाप्रकारे साठवा, अनेक महिने राहील फ्रेश
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
उन्हाळ्यात तर आपण आंबे खातोच पण काही लोकांना आंबे इतके आवडतात की त्यांना ते आंब्याचा सिझन संप्यानंतरही खावेसे वाटतात. या लोकांना मग बाजारातील पॅकेज्ड मँगो ज्यूस घ्यावा लागतो. मात्र त्याला आंब्याची सर नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही आंबे साठवल्यास तुम्ही ते सीझननंतरही खाऊ शकता.
advertisement
advertisement
चार-पाच दिवस आंबे कसे साठवायचे : फक्त चार-पाच दिवस आंबे चांगले ठेवायचे असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवता येतात. आंबे उष्णतेत ठेवले तर ते कुजतात, त्यामुळे त्यांची चवही बिघडते. जर तुम्हाला चार ते पाच दिवस आंबे ठेवायचे असतील तर थोडे कडक आंबे विकत घ्या, जे फ्रीजमध्ये बरेच दिवस ठेवता येतील.
advertisement
advertisement
त्यानंतर यातील कोय वेगळी करा. आंब्याचे हे तुकडे हवाबंद डब्यात ठेवा, झाकण बंद करा आणि हा डबा फ्रीजमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुम्ही अनेक दिवस आंबे खाऊ शकता आणि ते पुन्हा पुन्हा सोलण्याचा त्रासही होणार नाही.
advertisement
advertisement
advertisement
सीझन संपल्यानंतर आंबा खाण्यासाठी तो असा साठवा : सीझन संपल्यानंतरही आंबा खायचा असेल तर आंब्याचा पल्प काढून त्याची प्युरी बनवा. ही प्युरी बर्फाच्या ट्रेमध्ये भरून बर्फाचे तुकडे बनवा. आता प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद बॉक्समध्ये हे बर्फाचे तुकडे भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. त्यामुळे आंब्याची चव खराब होणार नाही आणि तुम्ही सिझन संपल्यानंतरही आंबे खाऊ शकता.
advertisement