When To Eat Rice : वजन कमी करायचं असेल तर 'या' वेळी चुकूनही खाऊ नका भात; पाहा योग्य वेळ
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
भाताबाबत लोकांच्या मनात वेगवेगळ्या समजुती आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की भात खाल्ल्याने वजन वाढते किंवा पोट फुगते, तर काही लोक हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानतात. खरं तर भात खाण्याची योग्य वेळ जाणून घेणं जास्त आवश्यक आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने भात खाल्ल्यास वजन वाढत नाही.
advertisement
अनेकदा भात खाण्याबाबत अनेक शंका निर्माण होतात की रात्री भात खावा की नाही. avogel.co.ukमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, समस्या भात खाण्यात नसून तो चुकीच्या वेळी खाण्यात आहे.
advertisement
advertisement
तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असाल तर भाताचे सेवन करू नका. याशिवाय तुम्ही भात खात असाल तर रात्री फक्त ब्राऊन राईस खा, त्यामुळे तुम्हाला कार्ब्सऐवजी फायबर मिळेल. याद्वारे तुम्ही तुमच्या संपूर्ण आहारात जास्त प्रमाणात प्रथिने मिळवू शकता.
advertisement
advertisement
advertisement