advertisement

Kids Tiffin Recipe : मुलांच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय, 15 मिनिटात बनवा गाजर बटाट्याचे हेल्दी आणि टेस्टी कटलेट!

Last Updated:

Healthy and tasty cutlet recipe in marathi : ही रेसिपी हेल्दी, टेस्टी आहे, झटपट तयार होते आणि मुलांनाही खूप आवडेल. आम्ही बोलत आहोत. पोहे आणि गाजराच्या कटलेटविषयी. ते दिसायलाही आकर्षक बनतात आणि मुलांसाठी खूप निरोगीही असतात.

गाजर पोहे कटलेट बनवण्याची पद्धत
गाजर पोहे कटलेट बनवण्याची पद्धत
मुंबई : मुलांच्या डब्याला काय द्यावे हे बऱ्याचदा कळत नाही. त्यातही मुलं रोज रोज भाजी पोळी किंवा पराठे खाण्याचा कंटाळा करतात. अशावेळी एखादी ही भन्नाट रेसिपी तुमची मदत करू शकते. ही रेसिपी हेल्दी, टेस्टी आहे, झटपट तयार होते आणि मुलांनाही खूप आवडेल. आम्ही बोलत आहोत. पोहे आणि गाजराच्या कटलेटविषयी. ते दिसायलाही आकर्षक बनतात आणि मुलांसाठी खूप निरोगीही असतात.
इंस्टाग्रामवर aartis_recipe_marathi या अकाऊंटवर ही रेसिपी शेअर केली गेली आहे. त्यांनी पोहे आणि गाजर वापरून अगदी सोप्या पद्धतीने आकर्षक असे कटलेट कसे बनवायचे ते सांगितले आहे.
गाजर पोहे कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- बटाटे
- गाजर
- मटार
- कोथिंबीर
- पोहे
- बारीक शेवया
- गव्हाचं पीठ
- धने पूड
advertisement
- जिरे पूड
- चाट मसाला
- लाल तिखट
- लिंबाचा रस
- मीठ
- तळण्यासाठी तेल
गाजर पोहे कटलेट बनवण्याची पद्धत
- सर्वात आधी एका कुकरमध्ये बटाटे, गाजर आणि मटार उकडून घ्या.
- त्यानंतर 10 मिनिटं पोहे खाडेंसें पाणी घालून भिजत ठेवा, जसे पण पोह्यांसाठी करतो तसेच.
- उकडलेले बटाटे, गाजर आणि मटार पाण्यातून बाहेर काढून मॅश करून घ्या.
advertisement
- मॅश केलेल्या मिश्रणात भिजवलेले पोहे आणि कोथिंबीर घाला.
- याच मिश्रणात धने पूड, जिरे पूड, चाट मसाला, लाल तिखट, लिंबाचा रस आणि मीठ घाला.
- आता हे मिश्रण हाताने चांगलं मळून घ्या आणि याचा एकजीव गोळा तयार करा. यामध्ये वरून पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही.
- आता हे मिश्रण 5 मिनिटे बाजूला ठेवा. एका वाटीमध्ये स्लरी बनवण्यासाठी गव्हाचं थोडंसं पीठ घ्या त्यात चिमूटभर मीठ आणि पाणी टाकून माध्यम स्लरी तयार करा.
advertisement
- आता बारीक शेवया घ्या, त्या थोचुरा करा.



 










View this post on Instagram























 

A post shared by Aarti Nagare (@aartis_recipe_marathi)



advertisement
- पोहे कटलेटचे मिश्रण घेऊन हातावर छोटे छोटे कटलेट बनवून घ्या.
- हे कटलेट गव्हाच्या स्लरीमध्ये बुडवून घ्या आणि नंतर त्याला बारीक शेवया कोट करून घ्या.
- सगळे कटलेट कोट करून झाल्यांनतर तेलात लो मिडीयम फ्लेमवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तुम्ही हे कटलेट एअर फ्राय देखील करू शकता.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kids Tiffin Recipe : मुलांच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय, 15 मिनिटात बनवा गाजर बटाट्याचे हेल्दी आणि टेस्टी कटलेट!
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement