नवीन लॅपटॉप घेताच करुन घ्या हे 5 आवश्यक काम! परफॉर्मेंस होईल स्मूद
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
नवी लॅपटॉप सेटअप करणे मजेदार एक्सपीयन्स असतो. खरंतर हे फक्त फेव्हरेट अॅप्स इंस्टॉल करणे आणि डेटा ट्रान्सफर करण्यापर्यंत मर्यादित नसते. तुम्ही अनेक कामही केले पाहिजेत.
नवीन लॅपटॉप सेटअप करण्याचा वेगळाच आनंद आहे. लॅपटॉप सेटअप करण्याचा अर्थ फक्त आपले फेव्हरेट अॅप्स इंस्टॉल करणे, आवश्यक डेटा ट्रान्सफर करणे आणि लूक पर्सनलाइज करणे असं होत नाही. तुम्हाला लॅपटॉपमधून शानदार परफॉर्मेंस आणि प्रायव्हसी हवी असेल तर आणखी काही कामं करणेही गरजेचे आहे. आज आपण जाणून घेऊया की, नवीन लॅपटॉप घेताच सर्वात आधी तुम्ही कोण-कोणते काम केले पाहिजेत.
advertisement
बॅटरी चार्जिंग लिमिटेड करा : तुम्ही तुमचा लॅपटॉप चालू करताच त्याची बॅटरी जुनी होऊ लागते. तुम्ही ते अगदी नवीन दिसण्यासाठी काहीही करू शकत नाही, परंतु जुनाट होण्याची प्रक्रिया मंदावण्याचे काही मार्ग आहेत. तुमचा लॅपटॉप घेताच तुम्ही बॅटरी चार्जिंग मर्यादित करू शकता. बॅटरी चार्ज 80 टक्क्यांपर्यंत मर्यादित करून, तुम्ही चार्जिंग दरम्यान बॅटरीवरील भार कमी करू शकता आणि बॅटरीचे आयुष्य वाढवू शकता.
advertisement
ब्लॉटवेयर हटवा : नवीन लॅपटॉपमध्ये कंपन्या अनेक प्रकारचे असे प्रोग्राम प्री-इंस्टॉल करुन देतात. ज्याची तुम्हाला गरजच नसते. यामध्ये अॅप्सपासून तर अँटीव्हायरस सॉफ्टवेयर आणि अनेक टूल्सचा समावेश असतो. यांना ब्लॉटवेयर म्हटले जाते. हे लॅपटॉपला नुकसान करत नाही, पण यामुळे स्टोरेज भरते आणि हे ऑटोमॅटिक लॉन्च होतात. ज्यामुळे स्पीड स्लो होते. यापासून बचावासाठी त्यांना अनइंस्टॉल करा.
advertisement
advertisement
advertisement









