Ghuskhor Pandat Movie: वादात सापडलेल्या मनोज वाजपेयीच्या चित्रपटाचं नाव बदलणार, निर्मात्यांनी दिली अपडेट
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Manoj Bajpeyee Movie Name Rename: बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी सध्या 'घूसखोर पंडत' चित्रपटाच्या वादामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या नावामुळे निर्मात्यांविरोधात ब्राह्मण समाजाने विरोध दर्शवला आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या नावावरून महत्त्वाचे पाऊल उचलले.
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी सध्या 'घूसखोर पंडत' चित्रपटाच्या वादामुळे कमालीचा चर्चेत आहे. चित्रपटाच्या नावामुळे दिग्दर्शकांविरोधात आणि निर्मात्यांविरोधात ब्राह्मण समाजाने विरोध दर्शवला आहे. या वादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळाला. ब्राह्मण समाजाकडून चित्रपटाच्या निर्मात्यां विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली होती. आता अशातच चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या नावामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जोर धरत असताना चित्रपटाच्या टीमने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
टीझर आणि पोस्टरवर ब्राह्मण समाजाकडून संताप व्यक्त केला जात असताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी या वादामध्ये एक पाऊल मागे घेतले आहे. 'घूसखोर पंडत' या चित्रपटाच्या नावावरून देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. ज्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये निर्मात्यांविरोधात केस दाखल करण्यात आली होती. अलीकडच्या काही मिडिया रिपोर्टनुसार, 'घूसखोर पंडत' चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये चित्रपटाच्या नावामध्ये बदल करणार असल्याचे सांगितले आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये नाही तर, ओटीटीवर रिलीज होणार आहे.
advertisement
'घूसखोर पंडत' चित्रपटाच्या वादावर नेटफ्लिक्स ओटीटीने प्रतिक्रिया दिली आहे. कारण हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. "चित्रपट निर्मात्यांचे आणि दिग्दर्शकांचे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आम्ही लवकरात लवकर चित्रपटाच्या नव्या नावाची घोषणा करू", अशी प्रतिक्रिया ओटीटीने दिली. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत चित्रपटाचे टायटल आणि चित्रपटाचे प्रमोशनल कंटेंट अपमानजनक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'घूसखोर पंडत' चित्रपटाचा घूसखोरसोबत संबंध जोडल्याने ब्राह्मण संघटनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. उत्तर प्रदेशात दिग्दर्शकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती. शिवाय, अभिनता मनोज वाजपेयीचे पुतळाही जाळण्यात आला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 5:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ghuskhor Pandat Movie: वादात सापडलेल्या मनोज वाजपेयीच्या चित्रपटाचं नाव बदलणार, निर्मात्यांनी दिली अपडेट







