advertisement

Rohit Pawar: अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवारांची स्फोटक माहिती, पत्रकार परिषदेतील मुद्दे LIVE

Last Updated:

लोकांपर्यंत मी आज पोहचतोय.. काही लोकांनी भावनिक पोस्ट टाकल्या की दादा परत येतील.. ६ जण विमानात होते ६ वी व्यक्ती दाादांची होती. जी बॉडी सापडली ती दादांची नव्हती. 

News18
News18
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. अजितदादा सारख्या नेत्यांचं विमान अपघातात निधन झाल्यामुळे अपघात की घातपात अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुद्देसुद्दपणे विमान अपघात आणि विमान कंपनीबद्दल धक्कादायक माहिती सादरीकरण करून दिली आहे. यामध्ये अजितदादांनी विमान कंपनीबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे.
रोहित पवार याांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे 
रोहित पवार- महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला प्रश्न पडलाय की अजित दादा यांचा अपघात झाला की घातपात झाला..
लोकांपर्यंत मी आज पोहचतोय.. काही लोकांनी भावनिक पोस्ट टाकल्या की दादा परत येतील.. ६ जण विमानात होते ६ वी व्यक्ती दाादांची होती. जी बॉडी सापडली ती दादांची नव्हती.
advertisement
मी सांगेन, आज जर दादा परत आले तर मी पण त्यांना घट्ट मीठी मारेन.. पण मला गेले सगळे दिवस रोज उठायचो तेंव्हा वाटायचे की मी खोटे स्वप्न पाहिलं.  ही गोष्ट कुठे घडली नाही असं मला वाटत होतं, कधीपर्यंत
दादांचं स्वेटर, जळालेली चप्पल, त्यांचे घड्याळ जे ते रोज घालायचे ते पाहिले. दादा नेहमी १५ मिनिटं घडाळ पुढे ठेवत होते. दादांची घडी सापडली तेव्हा त्यामध्ये १५ मिनिटं पुढे होते. मला सांगायचे आहे की जे आपल्याला सगळ्यांना वाटतंय की दादा आपल्यातून गेले नाही तर ते सत्य आहे. पण दादांचे विचार मात्र आपल्यात आहे.
advertisement
हे प्रेझेंटेशन सादर करत आहे. मला ज्या लोकांकडून माहिती मिळाली ती  मी माहिती आणली आहे. तोही लोक म्हणतील की ही माहिती कुठून आणि कशी आली. अजितदादांच्या प्रेमापोटी माहिती आणली आहे. आम्ही सरकारमध्ये नाही,   खरं काय घडलं ते माहिती व्हावे यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे तपास यंत्रणा ज्या काही आहे, त्यांनी प्रयत्न केला तर रहस्य समोर येईल.
advertisement
सुरुवात केली तर अजितदादांच्या विमानाचं २७ मिनिटांमध्ये २१० किमी अंतर पार करायचं होतं. VSR नावाची कंपनी होती.  हे विमान एक Learjet 45 प्रकाराचे होते. हे विमान कॅनडामध्ये २०१० साली bombardier aerspace ने  बनवलं होतं. हे विमान सामन्य विमानापेक्षा फास्ट होतं.  डाव्या बाजूला अजितदादा बसलेले असावे, माागील भागात साहित्य होतं. पंखामध्ये हे पेट्रोल साठवलं जात होतं.
advertisement
VSR कंपनी ही विजय कुमार सिंग आणि सिमी सिंग आणि विस्टा सेल्स प्रा लिमिटेड कंपनीची कंपनी आहे. २७ वेगवेगळे शेअर होल्डर आहे. VSR कंपनीकडे सगळ्यात जास्त विमानं आहे. विजय कुमार सिंह आणि रोहित सिंग कंपनीचे मालक आहे. त्यांच्याकडे ७ विमानं आहे.
७.०२ वाजता विमानाचे क्रु मेंबर तिथे पोहोचले.
७.०३  कॅप्टनने विमानाची तपासणी केली
advertisement
७.१० वाजता दृश्यमानता ठीक आहे की नाही, याची विचारणा केली आणि ओके सांगण्यात आलं
७.१७ वाजता विदीप जाधव तिथे पोहोचले
७.५० अजितदादा विमानतळावर पोहोचले
७.५६ वाजता विमानााने मुंबई विमानतळाच्या एटीएसला सांगितलं,
८.१०. ५१ वाजता विमानाने टेकऑफ केलं
ही एकाा ग्रुप चॅटची माहिती आहे
८.२२ वाजता विमान हे लोणावळ्याजवळ होतं.
८.२५ वाजता विमान पुण्याजवळ होतं
advertisement
८.३० वाजता विमान यवत जवळ होतं
८.३२ वाजता विमान सुपे जवळ
८.४३ ते ८.४५ दरम्यान अपघात झाला
९ वाजता दादा गंभीर जखमी असल्याची माहिती
९.४५ वाजता दादांचं निधन झाल्याची माहिती आली.
हे विमान १६ वर्ष जुनं होतं, याच्याआधी २६ आणि २५ जानेवारी रोजी विमान सुरतला जाऊन आलं होतं.
आता हे महाशय मालक आहे, विजय सिंग यांनी विमान चांगल्या स्थितीत होतं, मेंटेन होतं, विमानाचे पायलटला उड्डाणाचा अनुभव होता. विमानाचा अपघात कमी दृश्यमानतेमुळे झाला असावा
स्थानिक बारामतीकरांनी प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, विमानाचा वेगळा आवाज येत होता.
ग्रामपंचायतीचा व्हिडीओ आहे, तिथे विमान बाजूला झुकलं आणि कोसळलं. हे सीसीटीव्ही फुटेज मिळालं म्हणून आपण चर्चा करत आहोत. जर हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं नसतं तर आज आपण ही चर्चा केली नसती.
विमानात अपघात का झाला?
१) विमानात काय बिघाड झाला होता? machanical failure झालं का?
2)विमान हे स्टॉल झालं, टेकऑफच्या आधी विमानाची एक मेकिनिकल टीमकडून तपासणी केली जात असते. टेकऑफ पूर्वी विमानाचं चेकअप करावं लागतं. चेकअप झालं होतं, चेकअप करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागणार आहे.
3) टेकलॉग कुठे आहे. विमानाचा airworthy report कुठे आहे?
4) विमानाचा रुटीन लाईन मेटेंन्स झाला नव्हता का? कुणी केला होता? hanger मधील सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत
5) विमानाचा हेव्ही बेस मेटेंन्स कधी झालं होतं का? त्याचा रिपोर्ट कुठे आहे?
कंपनीचा इतिहास काय
कंपनीचा याच विमानाचा १४ सप्टेंबर २०२३ मध्ये अपघात झाला होता, विमान हे Learjet 45 XR होतं, मुसळधार पावसामुळे विमानाचा मुंबईत विमानतळावर अपघात झाला. या अपघातात ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले होते.
मुंबई विमानतळावर ILS system आहे तरी घसरलं, या विमानाच्या अपघाताची चौकशी होऊन अहवाल येणे गरजेचं होतं, पण याचा अहवाल कधीच आला नाही. आतापर्यंत या विमानाचा अहवाल आला नाही. २ वर्ष झाले तरी अहवाल दाबण्यात आला. का हा अहवाल दाबण्यात आला. जर हा अहवाल समोर आला असता तर काही बदल झाले असते. जर हा अहवाल समोर आला असता तर अजितदादा आपल्यात असते. हा रिपोर्ट दाबला हा आमचा आरोप आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चर्चा झाली, २०२३ ला अपघात झाल्यानंतर आपल्या देशात कारवाई झाली नाही. EASA ने गंभीर दखल घेतली . EASA ने vsr ला विचारलं, अपघाताची माहिती देण्याचं सांगितलं. पण VSR कंपनीने कोणतीही कागदपत्र दिली नाही. EASA कडून VSR चा TCO third country operator परवाना स्थगिती करण्यात आली होती.
लेव्हल १ ची त्रुटी असल्याचे कारण देत EASA कडून VSR चा परवाना रद्द करण्यात आला होता. सुरक्षेचा गंभीर शेरा दिला होता. युरोपीय एजन्सीने VSR कंपनीच्या विमानाच्या सगळ्या परवानग्या काढून घेतल्या. पण भारतात अजूनही VSR कडून विमान प्रवास सुरू आहे. आमचा काका विमान अपघातात गेला, आता मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांच्या या विमानातून प्रवास होतो, मग VSR ला परवानगी कोण देतं.
VSR च्या बाबतीतल्या पुढे आलेल्या गंभीर बाबी :
१) Flight Duty Time Limitation (FDTL) नियमांचे उल्लंघन -- कागदपत्रांवर वैमानिकांच्या उड्डाणाच्या तासांमध्ये फेरफार केला जातो.
२) Cockpit Voice Recorders (CVR) - सर्व संभाषणं आणि आवाज रेकॉर्ड करणारे विमानाचे CVR वारंवार बंद असतात.
३) Checklist/Techlog विमान आणि दरम्यान पाळली जाणारी Checklist वापरण्याची पद्धत कंपनीमध्ये नसल्याची माहिती समोर आली आहे.
४) Standard Operating Procedure (SOP) - स्वतःची SOP नाही, उत्पादक कंपनीच्या SOP चे पालन केले जात नाही.
५) VSR कडून Cost cutting वर भर असल्याने विमानाची देखभाल आणि Maintenance कडे दुर्लक्ष केलं जातं.
विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती
Stall warning system –
दादा प्रवास करत असलेल्या विमानात Stall warning system नव्हती याची पक्की माहिती आहे. काही जणांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
Stall warning system शिवाय विमान उडवलेच कसे जात होती? Stall warning system नव्हती ही बाब Heavy (base) Maintenance मध्ये समोर आली नव्हती का?
(PTT) Push To Talk बटन चालू, त्यामध्ये Stall Warning System चा कोणताही आवाज का Record झाला नाही.
Stall Warning नसल्याचे TECH LOG मध्ये आले होते का?
विमान अत्यंत खाली उडत होतं. विमान एक आवाज देत असतं, वॉर्निंग देत असतं लँडिंग करताना. EGPWS इशारा दिला होता की नाही, PUSH to talk सुरू होते, संपूर्ण संभाषण ATC मध्ये ऐकलं जात होतं, ही सिस्टिम बंद होती.
या विमानाची  Heavy (Base) Maintenance योग्य पद्धतीने केला जात नाही.
MRO (Maintenance, Repair, and Overhaul) कडे न पाठवता Inhouse केला जातो.
कंपनीला स्वतःच Heavy (Base) maintenance करता येते का? त्यांच्याकडे तसे अधिकार आहेत का?
Heavy (Base) maintenance करणारे कर्मचारी कोण? आधी कुठल्या कंपनीत काम करत होते?
त्यांची चौकशी केली आहे का?
DGCA मधील काही माजी अधिकारी MRO मध्ये काम करतात त्यामुळे अधिक वेळ घालवल्यास कागदपत्रांसोबत छेडछाड होऊ शकते?
अतिरिक्त फ्युल टँक हा आमच्यासाठी बॉम्ब होता.
दादा हे खूप लांब जाणार नव्हते, माजी पायलटने सांगितलं की, अतिरिक्त पेट्रोलच्या ५० ५० लिटरच्या टँक आम्ही सोबत ठेवत होतो. हे तपासायचे असेल तर टेकऑफच्या आधी आणि टेकऑफच्या नंतर तपासता येईल. या विमानात जर असं पेट्रोल नेलं जात असेल तर ते अनधिकृत आहे. याची चौकशी झाली पाहिजे.
या कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाा पाहिजे. कंपनीच्या मालकाच्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. सर्व नियमांचं उल्लंघन केलं आहे. युरोपियन कंपनी EASA ने या कंपनीचे TCO परवाना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केला असल्यावर आपल्या भारतातील यंत्रणांची दखल का घेतली नाही
EASA ने या कंपनीवर कारवाई केली असताना देखील राज्य सरकारने या कंपनीची सेवा का घेतली?
सरकारकडून विमानाचं बुकिंग कसं होतं? 
शासकीय VVIP व्यक्तींसाठी विमान बुक करण्यासाठी दोन कंपन्या आहेत १ sai aviation आणि arrow
1 ते १५ तारखेपर्यंत साई तर १६ ते ३० जानेवारी तारखेपर्यंत aarow
विमानाच्या बुकिंगसाठी एक व्हॉट्स ग्रुप आहे. साईचा एक ग्रुप आहे आणि aarow चा एक ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये मंत्र्यांच्या पीए असतात. २७ जानेवारी रोजी aarow च्या ग्रुपमध्ये मुंबई ते बारामती जाण्यासाठी मेसेज टाकला होता. हा मेसेज ७ वाजून १३ मिनिटाने टाकला होता. त्यानंतर aarow विमान सेवा देणाऱ्या कंपनीकडून क्रिस्टोफर जोसेफ नावाच्या मॅनेजरने नोटेड सर असं सांगितलं होतं. त्यामुळे दादा विमानाने जाणार होते हे प्री प्लॅन होतं असं अजिबात नाही.  आदल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता हा मेसेज टाकला होता. दुसऱ्या दिवशी अजितदादा हे गाडीने बारामतीला जाणार होते. दादांचा ताफा हा निवासस्थानाबाहेर उभा होता. त्याच्या आधी संध्याकाळी विमानाच्या बुकिंगसाठी मेसेज केला होता.
aarow कंपनी कुणाची?
सरकारी विमाने बुक करण्याचे काम करणारी कंपनी या कंपनीच्या लोकांना विमानतळावर फेवर दिले जाते. एका हॅडलरला सर्व  VIP प्रवाशांची माहिती असायची तो हँडलर कोण होता, याा कंपनीचा डायरेक्टर पतंजली कंपनीचा डायरेक्टर असल्याची माहिती आहे.
घातपात आहे का?
कदाचित घातपात असण्याची शक्यता आहे. एक सुरक्षा एजन्सीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मोसाद संघटना माहिती आहे का, त्याने एक पुस्तक दिलं,  डेगन नावाच्या पुस्तकात माहिती दिली आहे. कधी कधी सर्वात प्रभावी म्हणजे चालकाला ठार करणे आणि तेवढेच पुरेसे असते.
२७ जानेवारी रोजी वेळापत्रकानुसाार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्यात येणार होते.
ताफा देखील लागला होता,. पण दादा निघाले नाहीत. पण गाडीने जाऊ शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं विमान २७ तारखेला बूक केलं होतं.
पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलीवर सही करायची होती.  त्या फाईलीवर सही करायची होती. दादा एका मोठ्या नेत्याला भेटणार होते, त्या नेत्याला यायला उशीर झाला का. दादांचा मोबाईल चेक करा, लँडलाईन फोन चेक करा. त्या फाईलीवर सही करायची होती, दादा कोणतीही फाईल रिकामी ठेवत नाही. ती फाईल मंत्रालयात होती. दादांच्या केबिनमध्ये दादांनी ती फाईल बोलावली, त्यामुळे येईपर्यंत वेळ गेला, ती फाईल आली. एक मोठा नेता बोलत असेल तर दादांनी फाईलीवर सही केली. त्यामुळे वेळ गेला.
तिथे आमच्या जिवा भावाची माणसं आहे, काही कर्मचाऱ्यावर आमचा विश्वास होता, तेव्हा चर्चेतून माहिती आली, कोणता तरी राजकीय कन्सलंट होता, त्याच्याकडून काहीच मिळत नाही, त्यामुळे हा कंत्राट रद्द करायचा होता, तो शेकडो कोटींचा कंत्राट होता, तो रद्द करायचा होता. बारामतीत हॉस्टेलमध्ये आम्ही भेटलो होतो, दादांनी काही लोकांना सांगितलं होतं, आम्हाला राजकारणात शहाणपण शिकवू नका. सर्व्हे तुम्ही करा अशी चर्चा झााली होती. त्यामुळे दादांना यायला उशीर झाला.
पायलट ट्रफिकमध्ये कसा अडकला? 
मदन यांचे नाव होते पण आदल्या दिवशी नावे बदलली गेली. कपूर बाहेर गावातून आले होते त्यामुळे ते जाणार नव्हते. पण मग फोन आला. असे स्टेटमेंट आम्ही सोशल मीडियावर ऐकले. का बललले तर ते दोघे जण ट्राफिकमध्ये अडकले. जे ट्रॅफिकमध्ये अडकले त्यांचे सीडीआर काढा.. ते कुठे राहायला होते हे दोघे जण अचानक आले कसे? ब्रेथ ॲनलाईज केले काय?
त्या पायलटने सगळे चेक केले का? कपूर हे हाँगकाँग वरून आले होते ते खरे आहे का? ते दारू पिऊन होते का? त्यांच्या परिवारासा माझे म्हणणे आहे की आमचा माणूस गमवला. हा कपूर खूप दारू प्यायला होता म्हणून ट्रेनिंगला नेलं नाही, आता हे पहा या चॅटमध्ये काय लिहिले आहे. २ जानेवारीचा आहे. या स्टंटचे उत्तर काय? हे मला माहिती नाही. या चॅटमध्ये पुन्हा लिहिले आहे की सुमित रात्रीचे स्टंट करत जाऊ नको.
विमानात शेवटच्या मिनिटाला ट्रान्सपॉन्डर बंद झाले
शेवटच्या एका मिनिटाला ट्रान्सपॅान्डर बंद झाला होता. आम्हाला सगळी माहिती मिळाली पण शेवटच्या एका मिनिटांची नाही. हा ट्रान्सपॅानंडर बंद झाला होता की कोणी बंद केला होता. ही अत्यंत सोपी अशी स्ट्रीप्ट आहे. ती फ्लॅट आहे. त्याने पहिल्यांदा रनवे ११ ची मागणी केली. नंतर मात्र त्यांनी रनवे २९ ची मागणी सुरू केली, ती का कळले नाहीत, त्यांनी ती मागणी नंतर अनेकवेळा केली.
बारामती एटीसीने ३ किमी आहे. पण ती ५ हजार असली पाहिजे त्याशिवाय परवानगी दिली कशी?  दादांना चुकीचा माहिती दिली होती त्यामुळे ते एअर क्राफ्टमध्ये चढले. त्याने खोटी माहिती दिली ती मुद्दाम दिली का? हे विमान धडकवण्याचं ठरलं होतं का? थ्रेशहोल्डच्या अलीकडे ते उतरले. जोवर ब्लॅकबॅाक्स मिळत नाही की कळत नाही.
मेन पायलटचा आवाज येत नव्हता.. तो का नव्हता.. ही नॅचरल रिॲक्शन होती.
पाठकचा अनुभव पूर्ण लेअरजेटवर होता. कपूर वेगवेगळ्या विमानात होता..
आम्हाला घातपात वाटतो. आमच्या परिवाराचे बाहेरच्या एजन्सीलडून तपास केला गेला पाहिजे
एएआयबी बीईए या एजन्सीकडून तपास व्हावा, अशी आमचं मागणी आहे.
सीआयडीला परवानगी आहे का एअरपोर्टवर सगळा एव्हीडेन्स मॅन्यूप्यूलंट करू शकते..
सीआयडी तिथे तपास करू शकत नाही..
रोहित पवार— दादा गेले काही महिन्यात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या सोडून काचेची बाटली वापरायला सुरूवात झाली होती.
स्वताचे विमान घ्यायला पाहिजे..
रोहित पवार- हा अपघात होता का घात होता तर आमची शंका आहे की हा घात होता. जी जी माहिती आमच्याकडे आले त्यावरून मी कुणावर शंका घेत आहे असे नाही. बराच राज्यात ती कंपनी काम करते तीने चुकीची माहिती दिली आहे.
आमचा सरकार किंवा कुणावर आरोप नाही. पण सीआयडीला ही अथॅारीटी नाही. गुजरातला ब्लॅक बॅाक्सचे बोलणे सांगितले नाही, पण आमचे म्हणजे आहे की कुटुंबातील कुणाला तरी ते संभाषण एकले जावे आम्हाला त्यांना सांगायचे आहे.
राजकियदृष्टीकोणातून नाही पण व्यवहारीक दृष्टीने काही गोष्टी दाबल्या जात आहे असे आम्हाला वाटते. संथ गतीने जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तपासात इट्रेन्स नाही, असे म्हणावे लागले. वीएसआर कंपनीच्या सर्व्हिस बंद कराव्यात. एक पत्र आम्ही केंद्राला देऊ..
सीएम साहेबांना काही लोक भेटे ज्यात ठोंबरेताई, मिटकरी हे भेटले त्यांनी विनंती केली आहे.
घातपात असल्याचा संशय आम्हा पवार कुटुंबांना
रोहित पवार- अजित दादांवर दबाव टाकणे शक्य नव्हते. पण दादा गेले काही दिवस ही काळजी घेत होते. त्या सर्व नेत्यांना जी सत्ता आहे ती मेंटेंन करण्यासाठी त्या पक्षातील नेत्यांना ते महत्वाचे वाटले असेल. कदाचित काहींच्या मनात नसताना त्यांनी शपथविधीची घाई केली.
आमच्यासाठी या नेत्यांना काय वाटते हे मला माहिती नाही. पण पार्थ, जय, काकी यांना मात्र आमच्या सारखेच वाटते असे माझे म्हणणे आहे. या अफवा नाही मी रोखठोक प्रेस घेत आहे. इतक्या कॅमेरासमोर मी काहीही बोलणार नाहीत काही नेत्यांची पक्षच वेगळा आहे. आमचा पक्ष वेगळा आहे आमचे काका गेले आहे आम्हाला उत्तर हवं आहे त्यांना नको असेल तर मला माहिती नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Pawar: अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवारांची स्फोटक माहिती, पत्रकार परिषदेतील मुद्दे LIVE
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement