आवाजाच्या दुनियेचा दुर्मिळ खजिना, PHOTOS पाहून तुम्हीही कराल कौतुक
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
आपल्या पुढच्या पिढीला रेडिओ, ग्रामोफोन नेमकं काय असतं हे दाखवण्यासाठी एक अवलिया प्रयत्न करतोय.
advertisement
पण हेच आपल्या पुढच्या पिढीला रेडिओ, ग्रामोफोन नेमकं काय असतं हे दाखवण्यासाठी एक अवलिया प्रयत्न करतोय. छत्रपती संभाजीनगर शहरातील संजय पवार यांनी या सर्व गोष्टींचा संग्रह तयार केलेला आहे.
advertisement
advertisement
advertisement
पवार यांच्याकडे लॅपटॉप सारखे दिसणारे चार रेकॉर्ड प्लेयर आहेत. तसेच काही पॉकेट रेडिओ देखील त्यांनी संकलित केलेलं आहे. त्यांनी हे सर्व साहित्य मुंबईच्या चोर बाजारातून तसेच संभाजीनगर येथील रविवारच्या बाजारामधून गोळा केलंय. त्याचबरोबर ते देशभरातून संग्राहक आहेत. विंटेज वस्तूंचं कलेक्शन करणारे त्यांच्याकडून ते साहित्य मागत असतात.
advertisement
आता या दुर्मिळ वस्तूंचे पार्ट कुठेही उपलब्ध नाहीत. त्यांना दुरुस्ती करणारे मेकॅनिक देखील आता नाहीयेत. म्हणून संजय पवार स्वतः हे सगळं शिकत आहेत. सर्व वस्तू ते स्वतः दुरुस्त करतात. त्यांना त्यांच्या संग्रहाचं छान संग्रहालय तयार करायचा आहे. पुढच्या पिढीला या सर्व गोष्टी माहिती व्हाव्यात म्हणून ते सर्वांसाठी खुले करणार आहेत. हेच त्यांचं ध्येय असल्याचं संभाजी पवार सांगतात.