advertisement

मुंबईत ठाकरेंना भाजपचं चेकमेट, महापौरपदासाठी मराठी चेहरा, तरी गुजराती मतदारांना कसं केलं खूश

Last Updated:

Mumbai Mayor News: मुंबईचा महापौर कोण होणार? मराठी होणार की अमराठी होणार? असा प्रश्न मागील काही दिवसांपासून सातत्याने विचारला जात होता. भाजपनं रितू तावडेंना महापौर पदाचा चेहरा घोषित करून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

News18
News18
Mumbai Mayor News: मुंबईचा महापौर कोण होणार? मराठी होणार की अमराठी होणार? असा प्रश्न मागील काही दिवसांपासून सातत्याने विचारला जात होता. महापालिका निवडणुकीच्या काळात भाजपच्या काही नेत्यांनी मुंबईचा महापौर अमराठी होणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजप पक्ष अडचणीत सापडला होता. ठाकरे बंधूंकडून भाजपवर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे भाजप कुणाला महापौर करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता अखेर भाजपनं रितू तावडेंना महापौर पदाचा चेहरा घोषित केला आहे.
रितू तावडेंना महापौर पदाची उमेदवारी देऊन भाजपनं ठाकरेंना चेकमेट केलं आहे. शिवाय त्यांनी गुजराती मतदारांना देखील खूश केलं आहे. त्यामुळे भाजपनं रितू तावडेंना महापौर करून एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे.

मराठी चेहरा देऊन गुजराती मतदारांना कसं खूश केलं?

खरं तर, रितू तावडे या घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे हा मतदारसंघ गुजराती बहुल आहे. मात्र रितू तावडे या स्वतः मराठा समाजातील असून एक खंबीर मराठी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. त्यांना महापौरपद देऊन भाजपकडून एकाच वेळी दोन मोठे मास्टरस्ट्रोक खेळण्याचा विचार केल्याचे बोललं जात आहे. मराठी चेहरा देऊन ठाकरेंना चेकमेट केलं, तर गुजराती बहुल भागातील नगरसेवकाला महापौर करून भाजपनं गुजराती मतदारांना देखील खूश केलं.
advertisement

पहिल्या भाजप महिला महापौर

रितु तावडे यांचा राजकीय प्रवास हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी जोडलेला आहे. शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा आणि माजी नगरसेविका म्हणून त्यांनी मुंबईच्या शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीमुळे घाटकोपर आणि ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रितु तावडे यांचे कार्य केवळ पालिका सभागृहापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी केलेल्या काही प्रमुख कामांची दखल जागतिक स्तरावरही घेतली गेली आहे.
advertisement

महिलांसाठी मोठं काम

'महिला आर्थिक विकास महामंडळाच्या' माजी संचालिका म्हणून काम करताना त्यांनी हजारो महिलांना रोजगाराचे साधन मिळवून दिले. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून महिलांना जरिकामालासारख्या व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले. घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांना त्या आजही मोफत कायदेशीर सल्ला आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असतात.
दरम्यान, रितू तावडे यांचं एस.वाय.बी.कॉम शिक्षण झालंय. तर त्या शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा होत्या. तर मुलगी मधुरा या वकील असून मुलगा यश हा कॅम्प्युटर इंजिनियर आहे. महापौरपदाची धुरा सांभाळल्यानंतर, 'शासन आपल्या दारी' आणि 'लाडकी बहीण' यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहोचवणे, हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितलं होतं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईत ठाकरेंना भाजपचं चेकमेट, महापौरपदासाठी मराठी चेहरा, तरी गुजराती मतदारांना कसं केलं खूश
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement