Gold Loan : 10 ग्राम सोन्यावर किती कर्ज मिळेल? कशी असेल EMI ची पद्धत

Last Updated:
10 ग्रॅमचं सोन्याचं वेढणं किंवा चैन असेल तर त्यावर बँकेकडून नेमकं किती कर्ज मिळेल? चला समजून घेऊ.
1/11
दैनंदिन जीवनात अनेकदा अशी वेळ येते की अचानक पैशांची गरज पडते. कधी मुलांची फी भरायची असते, तर कधी घराचं एखादं महत्त्वाचं काम निघतं. अशा वेळी आपल्या घरातलं सोनं आपल्यासाठी 'संकटमोचक' ठरतं. पण प्रश्न पडतो की, किती तोळं सोन्यावर किती कर्ज मिळतं? 10 ग्रॅमचं सोन्याचं वेढणं किंवा चैन असेल तर त्यावर बँकेकडून नेमकं किती कर्ज मिळेल? चला समजून घेऊ.

advertisement
2/11
10 ग्रॅम सोन्यावर किती कर्ज मिळू शकतं? जाणून घ्या गणितसोन्यावर कर्ज घेणं ही आता खूप सामान्य गोष्ट झाली आहे. पण कर्जाची रक्कम ठरवताना बँक काही महत्त्वाच्या गोष्टी बघते. यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'LTV' (Loan to Value Ratio).

3/11
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, तुमच्या सोन्याच्या आजच्या बाजारभावाच्या जास्तीत जास्त 75% पर्यंत रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून मिळू शकते.

4/11
नेमकं गणित कसं असतं?समजा, आज सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 1.30,000 रुपये (24 कॅरेट) आहे. पण दागिने सहसा 22 कॅरेटचे असतात, त्यामुळे बँका सहसा 22 कॅरेटचा हिशोब धरतात.

5/11
1. सोन्याची किंमत: समजा तुमच्या 22 कॅरेट सोन्याची किंमत साधारण 1,24,000 रुपये आहे. 2. बँकेचं व्हॅल्युएशन: बँक आधी तुमच्या दागिन्यांची शुद्धता तपासेल. जर त्यात खडे (Stones) असतील, तर त्यांचं वजन वजा केलं जातं. 3. मिळणारं कर्ज: जर 1,24,000 रुपयांचं सोनं असेल, तर 75% हिशोबाने तुम्हाला साधारण 93,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं.
1. सोन्याची किंमत: समजा तुमच्या 22 कॅरेट सोन्याची किंमत साधारण 1,24,000 रुपये आहे.2. बँकेचं व्हॅल्युएशन: बँक आधी तुमच्या दागिन्यांची शुद्धता तपासेल. जर त्यात खडे (Stones) असतील, तर त्यांचं वजन वजा केलं जातं.3. मिळणारं कर्ज: जर 1,24,000 रुपयांचं सोनं असेल, तर 75% हिशोबाने तुम्हाला साधारण 93,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं.
advertisement
6/11
हे आकडे सोन्याच्या रोजच्या भावाप्रमाणे बदलतात. जर सोन्याचा भाव वाढला तर कर्जाची रक्कम वाढते, आणि भाव कमी झाला तर कर्ज कमी मिळतं.

7/11
कर्ज घेताना या 3 गोष्टी लक्षात ठेवा:शुद्धता महत्त्वाची: तुमचं सोनं 18 कॅरेट, 20 कॅरेट की 22 कॅरेट आहे, यावर कर्जाची रक्कम ठरते. 24 कॅरेटच्या बिस्किटांवर काही बँका कर्ज देत नाहीत, फक्त दागिन्यांवर देतात.

8/11
प्रोसेसिंग फी: कर्ज घेताना बँक अर्धा ते एक टक्का प्रोसेसिंग फी आकारते. त्यामुळे हातात मिळणारी रक्कम थोडी कमी असू शकते. बँकांचा व्याजदर साधारण 8% ते 12% च्या दरम्यान असतो, तर प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांचा दर थोडा जास्त असू शकतो.
प्रोसेसिंग फी: कर्ज घेताना बँक अर्धा ते एक टक्का प्रोसेसिंग फी आकारते. त्यामुळे हातात मिळणारी रक्कम थोडी कमी असू शकते.बँकांचा व्याजदर साधारण 8% ते 12% च्या दरम्यान असतो, तर प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांचा दर थोडा जास्त असू शकतो.
advertisement
9/11
आपल्याला वाटतं की 10 ग्रॅम सोनं आहे म्हणजे पूर्ण सोन्याची किंमत खिशात येईल. पण आपण हे विसरतो की सोन्यात 'घडणावळ' (Making Charges) असते. बँक कर्ज देताना फक्त सोन्याच्या वजनाचा विचार करते, तुम्ही दिलेली घडणावळ किंवा जीएसटीची किंमत कर्जात धरली जात नाही.

10/11
थोडक्यात सांगायचं तर, आजच्या काळात 10 ग्रॅम सोन्यावर तुम्हाला आरामात 80,000 ते 95,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं (सोन्याच्या शुद्धतेनुसार). हे कर्ज घेणं सोपं असतं कारण यासाठी कोणत्याही मोठ्या कागदपत्रांची किंवा सिबिल स्कोरची गरज नसते.

11/11
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement