भारतातील अनोखं मंदिर, जिथं एकही मूर्ती नाही, पाहण्यासाठी परदेशातूनही येतात लोक
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Lotus Temple: भारतात अनेक प्रसिद्ध मंदिरे असून यातील विविध देवतांच्या मूर्तीही वैशिष्ट्यपूर्ण असतात. परंतु, दिल्लीत असं एक मंदिर आहे, जिथं कुणी पुजारी नाही आणि मूर्तीही नाही. याला लोटस टेंपल म्हणून ओळखळं जातं. लोटस टेंपल हे बहाई धर्माचे श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जातं.
दिल्लीतील लोटस टेंपल हे बहाई धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. भारतातील सर्वात अद्वितीय मंदिरांपैकी हे एक मानले जाते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणतीही मूर्ती नाही आणि धार्मिक विधीही केले जात नाहीत. त्याऐवजी, विविध धर्मांशी संबंधित पवित्र ग्रंथ येथे वाचले जातात. विविध धर्म आणि संस्कृतींच्या संगमाचे ते प्रतीक बनतात.
advertisement
लोटस टेंपलची वास्तुकलाच मंदिराचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य आहे. ही इमारत 27 मुक्त-स्थायी संगमरवरी पाकळ्यांनी बनलेली असून ती कमळाच्या फुलासारखी दिसते. या पाकळ्या नऊ भागांमध्ये विभागलेल्या तीन गुच्छांमध्ये आहेत. मंदिराचा मुख्य दरवाजा 40 मीटरपेक्षा जास्त उंच असून इथं नऊ दरवाजे आहेत. मंदिरात एकावेळी 2,500 लोकांची क्षमता असलेलं प्रार्थनागृह आहे.
advertisement
advertisement
advertisement