अभय सिंह, आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी आणि एयरोस्पेस इंजीनियर.
त्यांनी मोठ्या कंपनीतली लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली आणि अध्यात्माचा मार्ग स्विकारला.
‘कुंभमेळा 2025’मध्ये ते ‘आयआयटी बाबा’ नावाने प्रसिद्ध झाले.
त्यांनी आपल्या जगण्याचा उद्देश्य समजून घेण्यासाठी अध्यात्माच्या मार्गावरून प्रवास सुरू केला.
केवळ शिक्षणामुळेच नाही, तर आपल्या विचारांमुळे त्यांना महाकुंभमेळ्यात विशेष ओळख मिळाली.
किती चालणार, चालत चालत कुठे जाणार, शेवटी इथेच येणार…असं ते म्हणतात.
आयुष्यात संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी ते प्रेरणा बनले आहेत.