राज्यात पुन्हा कधी सक्रिय होणार मान्सून? नवीन तारीख  आली समोर

राज्यात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू, मान्सूनने घेतला ब्रेक

25-26 मे रोजी मान्सून मुंबई अन् कोकणात आला मात्र त्यानंतर पाऊस गायब

कमी दाबाचा पट्टा आणि दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा मान्सूनच्या प्रवासाला मोठा अडथळा

मान्सूनच्या वाटेत अडथळा आल्याने 15 जूनपर्यंत पाऊस नसेल, मात्र हवामान विभागाने नव्या तारखा जाहीर केल्या

राज्यात २२ ते २५ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार, मात्र मोठा पाऊस पडण्याची वाट पाहावी लागेल

पेरण्यांची घाई करू नये, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचा शेतकऱ्यांना इशारा

जुलै ते  सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी १०६ टक्के पाऊस पडेल

जून आणि जुलै महिन्यात अकोला, धुळे, राहीरी, परभणी, कोल्हापूर, पाथोद, निफाडमध्ये जून-जुलै पाऊस कमी होईल

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील, मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांना वाट पाहावी लागेल