मुंबईकर पाणी जपून वापरा, धरणांत फक्त 12 टक्के पाणीसाठा, जूनमध्येच पाणीकपातीचं संकट?

Last Updated:

Mumbai Water News: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील सरासरी पाणीपुरवठा 12 टक्केच राहिला आहे.

mumbai water supply: मुंबईकर पाणी जपून वापरा, जूनमध्येच पाणीकपातीचं संकट? धरणांत फक्त 12 टक्के पाणीसाठा!
mumbai water supply: मुंबईकर पाणी जपून वापरा, जूनमध्येच पाणीकपातीचं संकट? धरणांत फक्त 12 टक्के पाणीसाठा!
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही काळात मुंबईसह परिसरात जोरदार पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु, वाढलेले तापमान आणि त्यामुळे होणारे बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणी आठले आहे. आता सर्व धरणांत मिळून सरासरी 12 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत. परंतु, महापालिकेने मात्र मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं म्हटलंय.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील सरसारी पाणीपुरवठा 12 टक्क्यांवर आला आहे. परंतु, त्याचा नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याची हमी महापालिकेने दिलीये. तसेच मुंबईला 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशा रीतीने नियोजन केल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेय.
advertisement
अवकाळी पावसानंतरही जलसंकट
यंदा मुंबईत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, पावसानंतर देखील मुंबईवर उन्हाच्या झळांचा मारा सुरूच आहे. त्याचा परिणाम धऱणातील पाणीसाठ्यावर होत आहे. काही आठवड्यांपूर्वीच पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. त्यात पाणीपुरवठ्यात कपातीचा मानस नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेय. तसेच राज्य सरकारने देखील ‘निभावणी साठ्या’तून मुंबईला पाणी उपलब्ध करून दिलेय.
advertisement
जूनचा पहिला आठवडा कोरडा
यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर मान्सून देखील 10 दिवस लवकरच दाखल झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत पाऊस दडी मारून बसला आहे. जूनचा पहिला आठवडा कोरडाच जाण्याची शक्यता आहे. परंतु, त्यानंतरच्या काळात पावसाने वेळेत हजेरी लावल्यास पाणीकपातीचं संकट अजिबात राहणार नाही, असे पालिका सूत्रांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकर पाणी जपून वापरा, धरणांत फक्त 12 टक्के पाणीसाठा, जूनमध्येच पाणीकपातीचं संकट?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement