Vat Purnima 2024: वट पौर्णिमा निष्फळ! या रंगाच्या साड्या चुकूनही परिधान करू नयेत, पहा नियम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vat purnima 2024 : यंदाची वटपौर्णिमा 21 जून 2024 रोजी आहे. हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास्तव्य करतात असे मानले जाते. त्यामुळे वट सावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने या तिन्ही देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पतीला दीर्घायुष्याचे वरदान मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
वट सावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा का केली जाते? पौराणिक कथेनुसार, देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. माता सावित्रीच्या भक्ती आणि पावित्र्यतेने प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले. यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुष्य जगेल, असे वरदानही दिल्याचे मानले जाते. म्हणूनच या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि व्रताचे नाव देखील वट सावित्री आहे.
advertisement
वट सावित्री व्रताच्या दिवशी काय करू नये - वट सावित्री व्रताच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाच्या साड्या, कपडे परिधान करू नये, यामुळे अशुभ परिणाम मिळतात. महिलांनी काळे-निळे कपडे घालून पूजा केली तर त्याचे फळही मिळत नाही. या दिवशी लाल, हिरवा, पिवळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करा. काळ्या बांगड्या चुकूनही घालू नका.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वट सावित्री व्रत कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते, म्हणून वट सावित्री व्रत कथा वाचावी किंवा ऐका. कथा वाचताना किंवा ऐकताना अर्धवट राहू देऊ नये पूर्ण करावी. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)