Pune Traffic: अनंत चतुर्दशीला वाहतुकीत मोठे बदल, PMP च्या 5 स्थानकांचे स्थलांतर, कुठून सुटतील बस?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Ganesh Visarjan: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. पीएमपीच्या महत्त्वाच्या बसस्थानकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे.
पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान स्वारगेट आणि डेक्कन परिसरातील काही महत्त्वाचे चौक वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आपल्या पाच बसथांब्यांना तात्पुरते स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन ठिकाणांवरून बससेवा सुरळीतपणे सुरू राहणार असल्याची माहिती पीएमपीकडून देण्यात आली.
यंदा 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्ता हे मार्ग पूर्णत: बंद राहणार आहेत. यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून हे थांबे हलवण्यात आले असून प्रवाशांनी नवीन थांब्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
वाहतूक बदलामुळे PMP थांबे नवीन ठिकाणी
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) महत्त्वाच्या बसस्थानकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाहू महाराज स्थानक : लक्ष्मी नारायण चौकात हलवण्यात आले असून, येथून सातारा रस्ता मार्गावरील बस सुटतील.
नटराज बस स्थानक : पर्वती पायथा येथे सुरू राहणार असून, सिंहगड रस्त्यावरील बस येथून सुटतील.
advertisement
स्वारगेट बसस्थानक : सोलापूरमार्गे धावणाऱ्या बस आणि भवानी पेठ, नाना पेठकडे जाणाऱ्या बस आता वेगा सेंटर येथून सुटतील.
डेक्कन जिमखाना स्थानक : एसएनडीटी कॉलेजजवळ हलवले असून, कोथरूड डेपो, माळवाडी, एनडीए मार्गे जाणाऱ्या बस येथून सुटतील.
पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना विसर्जनाच्या दिवशी या बदलांची नोंद घेऊन नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 05, 2025 11:39 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: अनंत चतुर्दशीला वाहतुकीत मोठे बदल, PMP च्या 5 स्थानकांचे स्थलांतर, कुठून सुटतील बस?