advertisement

अँटॉप हिल प्रकरणात ट्विस्ट, पालकांचे नायर हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर आरोप, नोटमध्ये धक्कादायक गौप्यस्फोट

Last Updated:

स्तुतीच्या वडिलांनी या आत्महत्येला डॉ. बांगा देखील जबाबदार धरलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 15 दिवसांपूर्वी स्तुती आपल्या रूमध्ये रडत होती.

स्तुती सोनवणे
स्तुती सोनवणे
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील अँटॉप हिल परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील प्रसिद्ध डी. वाय. पाटील रुग्णालयात दंत चिकित्सा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका 24 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. स्तुती सोनावणे असे या मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या आत्महत्येसाठी सुसाईड नोटमध्ये दोनदा उल्लेख असलेल्या नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेजचे विभागप्रमुख डॉ. बांगा यांच्यावर देखील पालकांचा संशय आहे.
स्तुतीच्या वडिलांनी या आत्महत्येला डॉ. बांगा देखील जबाबदार धरलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 15 दिवसांपूर्वी स्तुती आपल्या रूमध्ये रडत होती. तिला विचारणा केली असता तिने सांगीतलं की डॉ. बांगा हे तिला त्रास देत आहेत. कधी खासगी कामं सांगितली जातात तर कधी डॉ. बांगा स्तुतीला घरी सोडालया सुद्धा सांगायचे. सुतूतीच्या वडिलांचा डॉ. बांगा यांच्यावर देखील संशय असून त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी आहे. मात्र, डॉ. बांगा यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून, ती मला माझ्या मुलीसारखी होती, असे म्हटले आहे.
advertisement
स्तुती सोनावणे अँटॉप हिल येथील आपल्या घरी पालकांसोबत राहत होती. 8 मार्च रविवारी रोजी रात्री आठच्या सुमारास स्तुतीचा तिच्या पालकांशी शेवटचा संवाद झाला होता. स्तुतीच्या पालकांनी तिला जेवणासाठी हॉटेलमध्ये येण्यास विचारणा केली. मात्र तिने झोपेचं कारण देत नकार दिला. रात्री घरी परतल्यावर पालकांनी तिला जेवलीस का विचारले असता तिने हो असं उत्तरं दिलं. यानंतर सगळे आपापल्या खोलीत जाऊन झोपी गेले. स्तुतीचे वडील रात्री लघुशंकेसाठी उठले असता त्यांना स्तुतीच्या रूमची लाईट सुरु दिसली. मात्र, लेक अभ्यास करत असेल असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी विचारणा केली नाही.
advertisement

स्तुतीच्या खोलीचं दार ठोठावलं पण...

सकाळी स्तुतीच्या वडिलांनी तिच्या खोलीचं दार ठोठावलं, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये शिरताच स्तुती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. हे दृश्य पाहून तिच्या बाबांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी स्तुतीला तात्काळ सायन रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
advertisement

सहा पानी सुसाईड नोट

सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा अँटॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता स्तुतीच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडत असलेल्या काही घटनांना कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे, तिने आपल्या नोटमध्ये मोहम्मद फुजैल खान नावाच्या प्रियकरावर गंभीर आरोप केलेत. फुजैल हा तिच्या चारित्र्यावर संशय घेणारे आरोप करायचा असे स्तुतीने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. फुजैलने तिच्या सोबत रिलेशनमध्ये असताना देखील एक डेटिंग एप इनस्टॉल केल्याचे स्तुतीने म्हटलं आहे. मला आशा आहे की तुझ्या पुरुषी अहंकाराला समाधान मिळाले असेल, असेही स्तुतीने म्हटले.
advertisement

सुसाईड नोटमध्ये डॉ. बांगांचा उल्लेख नेमका काय?

आपण सर्व काही नियंत्रित करू शकत नाही, माझं मन खूप खूप दु:खी आहे. ही एकटेपणा अजूनच वाढत चालली आहे. हो, माझे छान मित्र आहेत, माझं कुटुंब अगदी अप्रतिम आहे, जरी काही फरक असला तरीही, डॉ. बंगा नेहमी माझी काळजी घेत आहेत.
मला माफ करा आई, बाबा, माझी बहीण आणि डॉ. बांगा. मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला, पण हे खूप कठीण आहे. ही पहिली वेळ नाही, याआधीही मला असे विचार अनेकदा आले होते. यावेळी मात्र हे सगळं सहन करणं आणि समजून घेणं खूप अवघड झालं आहे.
advertisement
या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी संबंधित मित्राला तत्काळ ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तणावातून एका तरुण डॉक्टरने आपले जीवन संपवल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अँटॉप हिल प्रकरणात ट्विस्ट, पालकांचे नायर हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर आरोप, नोटमध्ये धक्कादायक गौप्यस्फोट
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement