advertisement

PAK vs BAN : वनडे मॅच फक्त 91 बॉलमध्ये जिंकली, घरात बोलून पाकिस्तानच तोंड काळ केलं, बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम

Last Updated:

वनडे सामन्यात पाकिस्तानच्या संघात सगळेच टी20 स्टार खेळाडू होते. पण हे सगळे स्टार खेळाडू असताना देखील पाकिस्तानला बांग्लादेशसमोर हार मानावी लागली आहे.

Pakistan vs Bangladesh
Pakistan vs Bangladesh
Pakistan vs Bangladesh : टी20 वर्ल्ड कप 2026 च्या समाप्तीनंतर पाकिस्तानची टीम बांग्लादेश दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यात पाकिस्तान बांग्लादेश विरूद्धचा पहिला वनडे सामना खेळवण्यात आला होता. या वनडे सामन्यात पाकिस्तानच्या संघात सगळेच टी20 स्टार खेळाडू होते. पण हे सगळे स्टार खेळाडू असताना देखील पाकिस्तानला बांग्लादेशसमोर हार मानावी लागली आहे. कारण बांग्लादेशने फक्त 91 बॉलमध्ये सामना जिंकत 8 विकेट राखून पाकिस्तानचा पराभव केला आहे.त्यामुळे बांगलादेशने घरात बोलून पाकिस्तानची लाज काढली आहे.
खरं तर ढाकाच्या शेरे बांग्ला स्टेडिअमवर पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात बांग्लादेश संघाने पाकिस्तानचा डाव 114 धावांवर ऑलआऊट केला होता.त्यामुळे बांग्लादेशसमोर 115 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशची सूरूवात खराब झाली होती. कारण सैफ हसन 4 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर हंजिद हसन तमिम आणि नजमुल शांतोने बांग्लादेशचा डाव सावरला होता. पण पुढे जाऊन शांतो 27 वर बाद झाला होता. त्यानंतर तांजिद तमीमने शेवटपर्यंत क्रिजवर उभं राहत 42 बॉलमध्ये 67 धावांची खेळी केली होती.त्याच्या या खेळीच्या बळावर बांग्लादेशने वनडे मॅच 15.1 ओव्हर म्हणजेच 91 बॉलमध्ये जिंकली होती.त्यामुळे बांगलादेशने हा सामना 8 विकेटने जिंकून पाकिस्तानचा करेंक्ट कार्यक्रम केला होता.
advertisement
पाकिस्तानच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर सूरूवात खराब झाली होती. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान 27 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर माज सदाकत 18 वर बाद झाला. त्यानंतक शामिल हुसेन 4, मोहम्मद रिझवान 10, सलमान आघा 5, हसन तुलत 4, अब्दुल समद 0,शाहिन आफ्रिदी 4, मोहम्मद वसीम 0 धावांवर बाद झाला होता. पाकिस्तानकडून फहीम अश्रमने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली होती. या बळावर पाकिस्तानचा डाव 30.4 ओव्हरमध्ये 114 धावांवर ऑल आऊट झाला होता.
advertisement
बांग्लादेशकडून नाहीद राणाने सर्वाधिक 5, मेहदी हसनने 3,तास्किन अहमद आणि मुस्तफिजूर रहमानने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : वनडे मॅच फक्त 91 बॉलमध्ये जिंकली, घरात बोलून पाकिस्तानच तोंड काळ केलं, बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement