देवगिरी किल्ल्याला लागली आग, एकच धावपळ, मोठं नुकसान PHOTOS
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
किल्ल्याच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठताना दिसत होते. आगीमुळे किल्ल्यावरील गवत आणि झुडपे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहेत.
advertisement
advertisement
या आगीचा परिणाम किल्ल्यावर वास्तव्यास असलेल्या वन्यजीवांवरही झाला. आग पसरताच मोर, माकडे आणि विविध पक्षी घाबरून किल्ल्याच्या परिसरातून बाहेर पडून जवळच्या शेतांकडे धावताना दिसले. उन्हामुळे वाळलेले गवत आणि वेगाने वाहणारा वारा यामुळे आगीचा फैलाव झपाट्याने वाढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही वेळातच आग किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पसरल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, किल्ल्याच्या आतील भागात जाणारे रस्ते अतिशय अरुंद असल्याने अग्निशमन वाहनांना आतपर्यंत जाता आले नाही. त्यामुळे पुरातत्व विभागाचे सुरक्षा रक्षक आणि स्थानिक कर्मचारी यांनी किल्ल्यावर उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर तसेच हिरव्या झाडांच्या फांद्यांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
advertisement
दरम्यान, देवगिरी किल्ल्यावर उन्हाळ्यात वारंवार अशा प्रकारच्या आगीच्या घटना घडत असल्याची बाब समोर आली आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात लागलेली आग अनेक दिवस धुमसत राहिली होती. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे किल्ल्यावरील वनसंपदा आणि ऐतिहासिक वास्तूंना धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी इतिहास अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.










