एका लिपस्टिकची किंमत तुम क्या जानोगे! 1150000000 रुपये, इतकं त्यात काय आहे?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Most expensive Lipstick : मेकअपच्या जगात सर्वात महागडी लिपस्टिकची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. इतक की त्याच्या किमतीत तुम्ही आलिशान फ्लॅट खरेदी करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ही लिपस्टिक सामान्य ग्राहकांसाठी बनवलेली नाही. तिचं लक्ष्य अब्जाधीश आणि सेलिब्रिटी आहेत, जे गोष्टींना स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहतात. याशिवाय रेअर आणि लिमिटेड एडिशन ब्युटी प्रोडक्ट्सच्या शोधात असलेल्या लक्झरी कलेक्टर्सना लक्षात ठेवून बनवण्यात आली आहे. एका अनामिक अब्जाधीशाने त्याच्या पत्नीसाठी गिफ्ट म्हणून खरेदी केली होती.
advertisement
एच. कॉचर ब्युटी डायमंड इतका महाग असण्याचं कारण लिपस्टिकचा रंग किंवा फॉर्म्युला नाही तर त्याचं पॅकेजिंग केस आहे. पॅकेजिंग केस 18 कॅरेट शुद्ध सोन्यापासून बनलेलं आहे आणि त्यावर 1200 पिंक डायमंड जडवलेले आहेत. ही लिपस्टिक केवळ विशेष मागणीनुसार बनवली जाते. ग्राहकांच्या सूचनांनुसार पॅकेजिंग बदलता येतं.
advertisement


