advertisement

Nagpur Accident News: देवदर्शनापूर्वीच काळाचा घाला, भीषण अपघातात वाहनांचा चक्काचूर, राजस्थानमध्ये महाराष्ट्रातील ३ जण ठार

Last Updated:

Accident news: राजस्थानातील सालासर रोडवर झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात नागपूरच्या कामठी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

देवदर्शनापूर्वीच काळाचा घाला, भीषण अपघातात वाहनांचा चक्काचूर, राजस्थानमध्ये महाराष्ट्रातील ३ जण ठार
देवदर्शनापूर्वीच काळाचा घाला, भीषण अपघातात वाहनांचा चक्काचूर, राजस्थानमध्ये महाराष्ट्रातील ३ जण ठार
नागपूर/सालासर: राजस्थानातील सालासर रोडवर झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात नागपूरच्या कामठी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या पारसे कुटुंबावर वाटेतच काळाने झडप घातली. या भीषण अपघातात पती, पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला असून, अन्य सहा जण गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे कामठीतील कचरीपुरा परिसरावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

कामठी येथील रहिवासी महादेव पारसे हे आपल्या कुटुंबासह राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी 'टवेरा' गाडीने निघाले होते. सालासर रोडवर त्यांच्या वाहनाला एका भरधाव पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की टवेरा गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये महादेव पारसे, त्यांच्या पत्नी कांता पारसे आणि मुलगा घनश्याम पारसे या तिघांचा जागीच प्राण गेला.
advertisement

६ जण गंभीर; रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातात गाडीचा चालक मनोज चिंदमवार यांच्यासह आराधना पारसे, पायल पारसे, पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना सालासर येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
advertisement

कामठीत हळहळ

पारसे कुटुंब हे कामठीतील कचरीपुरा भागातील प्रतिष्ठित कुटुंब मानले जाते. अपघाताची बातमी समजताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. एकाच कुटुंबातील तीन सदस्य दगावल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनानंतर नागपुरात आणले जाणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur Accident News: देवदर्शनापूर्वीच काळाचा घाला, भीषण अपघातात वाहनांचा चक्काचूर, राजस्थानमध्ये महाराष्ट्रातील ३ जण ठार
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement