advertisement

मित्रांनी आरडाओरडा केला, पण बघता बघता चिमुकला यश दिसेनासा झाला, सोलापुरात भयंकर घडलं

Last Updated:

Solapur News: घटनेची माहिती मिळताच सोलापूर येथील अग्निशामक दल आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले.

Solapur News: मित्रांनी आरडाओरडा केला, पण बघता बघता चिमुकला यश दिसेनासा झाला, सोलापुरात भयंकर घडलं
Solapur News: मित्रांनी आरडाओरडा केला, पण बघता बघता चिमुकला यश दिसेनासा झाला, सोलापुरात भयंकर घडलं
सोलापूर: उन्हाळा सुरू झाला की शाळा सकाळच्या सत्रात भरतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घरी परतल्यानंतर विहिरी, तलावाच्या ठिकाणी पोहोण्यासाठी जात असतात. तेव्हा काही अपघाताच्या घटनाही घडतात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका चिमुकल्याचा दगडखाणीत बुडून मृत्यू झाला. यश हरी हब्बू (वय 10) असे मृत मुलाचे नाव असून तो चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता. या घटनेमुळे कासेगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळची शाळा सुटल्यानंतर दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास यश हा आपल्या वर्गातील काही मित्रांसोबत गंगेवाडी येथील गट नंबर २२२/१ मधील बंद पडलेल्या दगडखाणीत पोहण्यासाठी गेला होता. या खाणीमध्ये पावसाचे पाणी साठलेले होते. पोहायला नीट येत नसल्याने यशचा तोल गेला आणि तो घसरून थेट खोल पाण्यात पडला.
advertisement
सदर खाण सुमारे ७० ते ८० फूट खोल असल्याने काही क्षणातच यश पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड करत मदतीसाठी हाका मारल्या, मात्र बघता बघता यश पाण्यात दिसेनासा झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर येथील अग्निशामक दल आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्यात शोधमोहीम सुरू केली. मात्र सायंकाळी आठ वाजेपर्यंतही यशचा मृतदेह सापडू शकला नव्हता. अंधार पडल्यामुळे शोधमोहीम राबविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
advertisement
या ठिकाणी तालुका पोलिस स्टेशनचे पीएसआय घोडके, हेड कॉन्स्टेबल रशीद बाणेवाले, सर्कल अधिकारी माळी, आरिफ हुडीवाले यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि ग्रामस्थ शोधमोहीम राबवत आहेत. कासेगावचे सरपंच आणि ग्रामस्थही घटनास्थळी उपस्थित राहून मदत करत आहेत.दरम्यान, एका निष्पाप चिमुकल्याचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने कासेगाव परिसरावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नाहीत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
मित्रांनी आरडाओरडा केला, पण बघता बघता चिमुकला यश दिसेनासा झाला, सोलापुरात भयंकर घडलं
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement