Ganeshotsav 2025: पणजोबा गणपतीला बर्फीची आरास! सोलापुरात 138 वर्षांच्या गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Ganeshotsav 2025: सोलापूर शहरातील पत्रा तालीम युवक मंडळ हे 138 वर्षापूर्वीचे मंडळ आहे. या मंडळाने एक आगळावेगळा उपक्रम राबवत बर्फी महोत्सव साजरा केला आहे.
सोलापूर - गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अशातच सोलापूर शहरातील पत्रा तालीम येथील गणेश मंडळाने एक आगळावेगळा उपक्रम राबवला असून गणरायाला बर्फीची आरास केली आहे. तब्बल 501 किलो खव्यापासून ही आरास तयार करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती पत्रा तालीम युवक मंडळ उत्सव अध्यक्ष आदित्य घाडगे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
सोलापूर शहरातील पत्रा तालीम युवक मंडळ हे 138 वर्षापूर्वीचे मंडळ आहे. या मंडळाने एक आगळावेगळा उपक्रम राबवत बर्फी महोत्सव साजरा केला आहे. पणजोबा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाडक्या बाप्पाला 501 किलो खव्यापासून तयार करण्यात आलेल्या बर्फीचा आरास करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील मंडळे पत्रा तालीम जवळ आल्यावर ही बर्फी प्रसाद म्हणून कार्यकर्त्यांना वाटप करण्यात येणार आहे. तसेच दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांनाही ही बर्फी प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे.
advertisement
दुधापासून खवा तयार करून त्यामध्ये बदाम, काजू पासून बर्फी तयार करण्यात आली आहे. तसेच बर्फी तयार करण्यासाठी डालड्याचा वापर न करता तुपाचा वापर करण्यात आला आहे. गणरायांना 501 किलो बर्फीची आरास तयार करण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागला आहे. तर कार्यकर्त्यांनी मिळून गणरायांना ही आरास करण्यासाठी दीड तासाचा कालावधी लागला आहे. सोलापूर शहरातील मंडळांनी व भाविकांनी पत्रा तालीम येथील मानाच्या पणजोबा गणरायाचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पत्रा तालीम युवक मंडळ उत्सव अध्यक्ष आदित्य घाडगे यांनी केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 05, 2025 2:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Ganeshotsav 2025: पणजोबा गणपतीला बर्फीची आरास! सोलापुरात 138 वर्षांच्या गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम