Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुण्याला यलो अलर्ट, गुरुवारचा हवामान अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज पुण्यासह घाटभागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज 4 सप्टेंबर रोजी कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्‍यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी 0.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 28 अंशावर स्थिर राहिल.
advertisement
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 26.9 अंश सेल्सिअस वाढले आहे. आज कमाल तापमान 24 अंशावर राहिल. तसेच पुढील 24 तासांसाठी कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्‍यता आहे.
advertisement
advertisement
advertisement









