2027 मध्ये मेष राशीत शनी करणार प्रवेश, 'या' 5 राशीच्या लोकांच्या नशिबाचे फिरणार चक्र; कोणाला राहावं लागणार सावध?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात, शनी ग्रहाला न्यायाधीशाचे स्थान आहे. असे म्हटले जाते की, त्याच्या साडेसातीच्या काळात आणि त्याच्या संक्रमणादरम्यान, शनी देव काही राशींना शिस्त आणि कठोर परिणाम शिकवतात.
Shani : ज्योतिषशास्त्रात, शनी ग्रहाला न्यायाधीशाचे स्थान आहे. असे म्हटले जाते की, त्याच्या साडेसातीच्या काळात आणि त्याच्या संक्रमणादरम्यान, शनी देव काही राशींना शिस्त आणि कठोर परिणाम शिकवतात. या वर्षी, शनी मीन राशीत आहेत, परंतु 2027 मध्ये, शनी देव मेष राशीत प्रवेश करणार आहेत. 3 जून 2027 रोजी शनी आपल्या सध्याच्या मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल. विशेष म्हणजे, मेष ही शनीची 'नीच' रास आहे. जेव्हा कोणताही ग्रह आपल्या नीच राशीत असतो, तेव्हा त्याचे शुभ फळ देण्याचे सामर्थ्य कमी होते आणि संघर्षाचा काळ सुरू होतो. शनीचा हा बदल एकूण 5 राशींसाठी कठीण काळ घेऊन येणार आहे. या काळात आर्थिक, शारीरिक आणि मानसिक आघाड्यांवर या राशींची परीक्षा घेतली जाईल.
या राशींना राहावं लागणार सावध
मेष: शनी तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या साडेसातीचा दुसरा आणि सर्वात कठीण टप्पा सुरू होईल. आरोग्याच्या तक्रारी आणि मानसिक तणाव वाढू शकतो.
वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. विनाकारण खर्च वाढतील आणि कामात अडथळे येतील.
मीन: मीन राशीसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा असेल. आर्थिक नुकसानाची शक्यता असल्याने गुंतवणुकीत सावध राहावे लागेल.
advertisement
धनु: शनीच्या या बदलामुळे धनु राशीवर शनीची अडीचकी सुरू होईल, ज्यामुळे कौटुंबिक कलह वाढू शकतात.
सिंह: सिंह राशीच्या जातकांसाठी देखील हा काळ संघर्षाचा असेल. नोकरीत बदलाचे योग आहेत, परंतु तो बदल आव्हानात्मक ठरू शकतो.
शनी कोणाला देतो साथ आणि कोणाला देतो संघर्ष?
शनी हा क्रूर ग्रह नसून तो एक शिस्तप्रिय शिक्षक आहे. शनीचे फळ हे पूर्णपणे व्यक्तीच्या 'कर्मावर' अवलंबून असते.
advertisement
शनी कोणाची साथ देतो? जे लोक प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत आणि गरिबांना मदत करतात, त्यांना शनी कधीच त्रास देत नाही. जे लोक शिस्त पाळतात, खोटे बोलत नाहीत आणि निसर्गाचा आदर करतात, त्यांना शनीच्या साडेसातीतही मोठी पदे आणि संपत्ती मिळते. शनी अशा लोकांचे रक्षण करतो ज्यांचे आचरण शुद्ध असते.
शनी कोणाला संघर्ष करायला लावतो? जे लोक इतरांना फसवतात, आळशी आहेत, आपल्या सत्तेचा गैरवापर करतात किंवा स्त्री आणि वृद्धांचा अपमान करतात, त्यांना शनी कठोर दंड देतो. शनीच्या काळात अशा लोकांचे अहंकार गळून पडतात आणि त्यांना शून्यातून सुरुवात करावी लागते. शनीचा संघर्ष हा व्यक्तीला शुद्ध करण्यासाठी आणि जीवनाचे खरे मूल्य शिकवण्यासाठी असतो.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 12:51 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
2027 मध्ये मेष राशीत शनी करणार प्रवेश, 'या' 5 राशीच्या लोकांच्या नशिबाचे फिरणार चक्र; कोणाला राहावं लागणार सावध?










