advertisement

PMRDA Pune: पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! PMRDA कडून 833 सदनिकांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ; पाहा नवी तारीख

Last Updated:

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

PMRDA कडून सदनिकांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ
PMRDA कडून सदनिकांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. पीएमआरडीएकडून काढण्यात आलेल्या सदनिकांच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आता २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत २७ जानेवारीपर्यंत होती.
पीएमआरडीएने पेठ क्र. १२ मधील ३४० आणि पेठ क्र. ३०-३२ मधील ४९३ अशा एकूण ८३३ शिल्लक सदनिकांसाठी १४ डिसेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रे गोळा करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे अनेक इच्छुक नागरिकांना अर्ज भरता आले नव्हते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.
advertisement
अर्ज भरताना नागरिकांना काही तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला होता. तसेच अनेक लाभार्थ्यांकडे वेळेवर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती. अधिकाधिक सामान्यांना आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करता यावं, यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पीएमआरडीएच्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता विभाग) पूनम मेहता यांनी आवाहन केलं आहे की, नागरिकांनी मुदतवाढीचा फायदा घेऊन आपले अर्ज वेळेत सादर करावेत. अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत सूचनेनुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता असल्याची खात्री करून घ्यावी.
advertisement
अर्ध्या पुण्याचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि पंपिंग स्टेशनमध्ये तातडीची विद्युत आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे गुरुवारी (२९ जानेवारी) शहराच्या निम्म्याहून अधिक भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिवसभर पाणी बंद राहिल्यानंतर, शुक्रवारी (३० जानेवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बुधवारीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
PMRDA Pune: पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! PMRDA कडून 833 सदनिकांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ; पाहा नवी तारीख
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement