advertisement

Bigg Boss Marathi 6 : आधी चावी, नंतर अंडी आता टोळीवरच मारला डल्ला, बिग बॉस मराठीच्या घरा पुन्हा चोरी

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 मध्ये अनुश्री मानेने अंडी आणि चावी चोरी केली. घरातील वातावरण बिघडलेलं असताना घरात आणखी एक चोरी झाली आहे.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील तिसरा आठवडा सुरू झाला आहे. घरात दुसऱ्या आठवड्यात पहिलं एलिमिनेशन झालं ज्यात डान्सर राधा पाटिल घराबाहेर गेली. त्यानंतर आता घरात वेगळात राडा सुरू झाला आहे. बिग बॉसच मराठी 6 चं घर हे चोरीचा अड्डा झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण घरात प्रत्येक दिवसाआड काहीतरी चोरीला जात आहे. पहिल्या आठवड्यात चावी चोरीला गेली. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात सदस्यांची अंडी चोरीला गेली आहे. त्यानंतर आता घरात आणखी एक चोरी झाली आहे.
पहिल्या आठवड्यात सोनाली राऊतची चोरी अनुश्री माने हिने चोरली. तो तिचा गेम होता असं तिनं सगळ्यांना सांगितलं. चावी चोरीला गेल्याचा आळ सागर कारंडे, सचिन कुमावत आणि आयुष संजीववर आला. तिघांनीही आरोप मनावर घेतला आणि तो खोटा असल्याचं सिद्ध करण्यासाठी न जेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घरातील संपूर्ण वातावरण बिघडलं.
advertisement
चावी प्रकरण सुरू असताना घरात विविध कारणांवरून भांडणं सुरू होती. अशातच तिसरा आठवडा सुरू होत नाही तोच बिग बॉसने दिलेल्या राशनमध्ये सदस्यांची अंडी गायब झाली. ही अंडी टोळीच्या सदस्यांनीच चोरल्याचं कबूल देखील केलं. आधी चावी अनुश्रीने चोरल्याचं कबूल केलं त्यानंतर आता अंडी देखील अनुश्रीनेच मस्करीमध्ये चोरली आणि ती परत दिली. पण अनुश्री ऐवजी तिच्या चोरीची जबाबदारी विशालने घेतली.
advertisement
यानंतर घरात दिव्याने टोळीचं जेवण करणार नाही असा निर्णय सांगितला. त्यानंतर टोळीचं जेवण बनवणार नाही असा ठाम निर्णय इतरांनी घेतली. या सगळ्यात टोळीतील रोशनने टोळीची साथ दिली नाही.



 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



advertisement
अंडी चोरण्याचा राडा सुरू असताना आजच्या भागात घरात आणखी एक चोरी झाल्याचं पाहायला मिळणार आहे. बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात विशालचा बॉडीवॉश चोरीला गेला असून तो त्याला कॅप्टन आयुषच्या रूममध्ये सापडतो असं दाखवण्यात आलं आहे.
प्रोमोमध्ये विशाल म्हणतो, माझं एक पूर्ण बॉडीवॉश हरवलं होतं. चोरी एक वृत्ती आहे असं मी ऐकलं. आमचं जेवण बंद केलं तुम्ही तीन वेळेचं.त्यानंतर विशाल बॉडीवॉशची बाटली आणून जमिनीवर फेकतो आणि म्हणतो मला आता कॅप्टन रूममध्ये ही बॉटल मिळाली. त्यावर आयुष म्हणतो, ती तिथे किती दिवसांपासून पडली आहे. त्यावर विशाल म्हणतो, तुम्ही डिसाइड करा की कोणाचं जेवण बंद करायला चालले आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : आधी चावी, नंतर अंडी आता टोळीवरच मारला डल्ला, बिग बॉस मराठीच्या घरा पुन्हा चोरी
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement