Mumbai Metro: बंद असलेले मेट्रोचे दरवाजे उघडले, खोळंबा संपला प्रवाशांचा वेळ वाचणार; ॲक्वा लाईन मेट्रो लाईनची सर्वात मोठी अपडेट
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपले. अधिवेशन आटोपल्यानंतर मेट्रो स्टेशनचे B- 5 गेट पुन्हा एकदा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे.
मुंबई: ॲक्वा लाईन मेट्रो सुरू झाल्यापासूनच प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ॲक्वा लाईन मेट्रो किंवा मेट्रो लाईन- 3 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासांना या मेट्रोचा मोठा फायदा होतो. नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपले. हे अधिवेशन आटोपल्यानंतर विधान भवन मेट्रो स्टेशनचे B- 5 गेटवरील एन्ट्री आणि एक्झिट पुन्हा एकदा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे बंद ठेवलेले गेट आता प्रवासी वापर करू शकणार आहेत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारीपासून विधान भवन मेट्रो स्टेशनचे B- 5 गेट बंद करण्यात आले होते. अधिवेशनादरम्यान परिसरात अनेक वरिष्ठ राजकीय नेते आणि मंत्र्यांची उपस्थिती लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संकुलाच्या सभोवतालचे प्रवेशद्वार बंद केले होते. सामान्य नागरिकांसाठी त्या गेटवरून एन्ट्री आणि एक्झिट बंद केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस 25 मार्च 2026 रोजी होता. तेव्हापासून सामान्य प्रवाशांसाठीचे निर्बंध आता हटवण्यात आलेले आहेत. प्रशासनाने B- 5 गेटमधून प्रवेश आणि बाहेर येण्याचा मार्ग पुन्हा सुरू केला असून, त्यामुळे प्रवाशांना ये- जा करणं सुलभ झाले आहे.
advertisement
Passenger Notification 🚨
B5 Entry/Exit Gate at Vidhan Bhavan Metro Station is now open. Passengers can use the same for station access.
Thank you for your cooperation and support.
प्रवाशांसाठी सूचना 🚨
विद्यान भवन मेट्रो स्थानकातील B5 प्रवेश/निर्गम गेट आता सुरू करण्यात आले… pic.twitter.com/KXbtkaeAjb
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) March 28, 2026
advertisement
B- 5 गेट सुरू झाल्यामुळे विधीमंडळामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी एन्ट्री आणि एक्झिट मिळवणं फार सोप्प झालं आहे. हा गेट सुरू झाल्यामुळे प्रवाशंची गर्दी कमी होण्याची आणि गर्दीच्या वेळी प्रवाशांचा प्रवाह सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. ॲक्वा लाईन मेट्रोने विधान भवन मेट्रो स्टेशनच्या A2 गेटवर लिफ्ट सुविधा कार्यान्वित केल्यानंतर प्रवाशांना ये- जा करण्यासाठी सुलभता वाढली आहे. A2 गेटवरून लिफ्टने आत आणि बाहेर येण्यासाठी प्रवाशांसाठी मार्ग खुला झाला आहे. या लिफ्टच्या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि गर्दीच्या वेळी स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. A2 गेटवरून प्रवाशांना मनोरा, नवीन आमदार निवास आणि वाय. बी. चव्हाण सेंटर या दोन्ही ठिकाणी थेट प्रवेश मिळतो, जिथे नेहमीच वर्दळ असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 6:29 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: बंद असलेले मेट्रोचे दरवाजे उघडले, खोळंबा संपला प्रवाशांचा वेळ वाचणार; ॲक्वा लाईन मेट्रो लाईनची सर्वात मोठी अपडेट










