लॅपटॉप अंथरुणावर ठेवून चार्ज करत असाल तर सावधान! आजच जाणून घ्या हे धोकादायक सत्य
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Laptop Charging Tips: सध्याच्या काळात लॅपटॉपचा वापर हे बरेच जण करतात. कारण ऑफिसचं काम असो किंवा कॉलेजमधील एखादा प्रोजेक्ट सर्वांना लॅपटॉपची गरज असते. अशावेळी त्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
Laptop Care Tips: सध्याचं युग हे डिजिटल आहे. या काळात स्मार्टफोनसह लॅपटॉपचा वापर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातो. आजच्या डिजिटल युगामध्ये ऑफिसचं काम असो की मग शाळा, कॉलेजचं काम. प्रत्येक गोष्टींसाठी लॅपटॉपची गरज पडते. अशावेळी आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लॅपटॉपची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असते. जेणेकरुन तुमचा लॅपटॉप हा दीर्घ काळ टिकू शकेल. पण तुमची एक लहानशी चूक तुमचं हे महागडं गॅजेट खराब करू शकते.
advertisement
आपण अनेकदा लॅपटॉप चार्जिंगला लावून बेडवर ठेवतो. अनेकदा तर लॅपटॉप चार्जिंगला लावूनच त्यावर महत्त्वाची काम करत बसतो. ज्यामुळे बॅटरी तर खराब होतेच. यासोबतच लॅपटॉपमध्ये आग लागण्याचाही धोका असतो. तुम्हालाही तुमच्या लॅपटॉपची लाइफ वाढवायची असेल आणि अशा प्रकारच्या समस्या टाळायच्या असतील. तर 5 चुका आजच सुधारा. कारण लॅपटॉप चार्ज करण्याची प्रोसेस खुपच लहान आहे. पण थोडंही दुर्लक्ष केलं तर तुमच्या लॅपटॉपची बॅटरी ही खराब होऊ शकते. ज्यामुळे चार्जिंग करताना काही सावधगिरी बाळगणे गरजेचं असतं.
advertisement
चार्जिंग करताना हेवी टास्क टाळा : अनेक लोकांना लॅपटॉप चार्जिंगला लावून काम करण्याची सवय असते. पण लॅपटॉप चार्ज होत असताना त्यावर हेवी टास्क करणं टाळलं पाहिजे. म्हणजेच व्हिडिओ एडिटिंग किंवा गेमिंग करणं टाळा. यामुळे प्रोसेसर आणि बॅटरी दोन्हीवर जास्त प्रेशर येतं आणि डिव्हाइस खुप जास्त गरम होतं. यामुळे लॅपटॉप चार्जिंगला लावलेला असताना हेवी काम करू नका.
advertisement
अंथरुण किंवा सोफ्यावर ठेवून चार्ज करू नका : तुम्ही तुमचा लॅपटॉप अंथरुण किंवा सोफ्यावर ठेवून चार्ज करत असाल तर हे आताच बंद करा. असं केल्याने लॅपटॉपच्या व्हेंट्स बंद होतात आणिहीट बाहेर निघू शकत नाही. ज्यामुळे मदरबोर्डसारख्या महागड्या पार्ट्सवर वाईट परिणआम होऊ शकतो. नेहमी डेस्क किंवा टेबल अशा ठिकाणी लॅपटॉप ठेवूनच चार्जिंग करा.
advertisement
advertisement
स्वस्त आणि लोकल चार्जरने चार्ज करू नका : तुमचा लॅपटॉप स्वस्त किंवा लोकल ब्रांडच्या चार्जरने चार्ज करू नका. असं केल्यास लॅपटॉपच्या लाइफवर परिणाम होऊ शकतो. हे चार्जर योग्य वोल्टेज देऊ शकत नाही. ज्यामुळे बॅटरी फुटणे किंवा शॉर्ट सर्टिक होण्याचा धोका राहतो. नेहमी ओरिजिनल किंवा सर्टिफाइड चार्जरचा वापर करा.
advertisement









