Watermelon Vs Muskmelon : उन्हाळ्यात कलिंगड खाणं चांगलं की खरबूज? 90% लोकांना माहित नसेल 'हा' महत्त्वाचा फरक
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
कलिंगड आणि खरबूज दोन्हींमध्ये काही फरक असतात, ज्यामुळे आपण आपल्या शरीरानुसार किंवा आपल्या गरजेनुसार कोणत्यावेळी कोणतं फळ खायचं आहे हे ठरवू शकतो.
मुंबई : उन्हाळ्यात आपल्याला रसाळ फळं खाण्याची इच्छा होते आणि आपल्यासाठी ते चांगलं देखील असतं. कारण त्यामुळे आपलं शरीर हायड्रेटेड राहातं आणि आपल्याला उष्णतेचा फार त्रास होत नाही. उन्हाळ्यातली फळं म्हणलं की आपल्यासमोर आधी येतात ते म्हणजे शहाळं, कलिंगड आणि खरबूज.. यातही कलिंगड आणि खरबूज काही प्रमाणात सारखेच असतात.
कलिंगड आणि खरबूज दोन्ही फळं खाण्यासाठी चांगली असतात. मात्र तरीही दोन्हींमध्ये काही फरक असतात, ज्यामुळे आपण आपल्या शरीरानुसार किंवा आपल्या गरजेनुसार कोणत्यावेळी कोणतं फळ खायचं आहे हे ठरवू शकतो. शरीरासाठी कोणतं फळ जास्त फायदेशीर आहे. कशामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं हे आज आपण पाहणार आहोत.
कलिंगड आणि खरबूजमधील फरक..
- उन्हाळयात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण कलिंगड आणि खरबूज खातो. या दोन्हींमध्येही पाण्याचं प्रमाण जास्त आहे. कलिंगडामध्ये सुमारे 91% पाणी असतं, ज्यामुळे उन्हाळ्यात ते शरीराला जास्त गारवा आणि हायड्रेशन देतं, तर खरबुजामध्ये पाण्याचे प्रमाण थोडे कमी म्हणजे सुमारे 90% असतं.
advertisement
- या दोन्हींमध्ये एकाच महत्त्वाचा फरक असतो, तो म्हणजे पोषक तत्वांचा.. कलिंगडाबद्दल बोलायचं तर 100 ग्रॅम कलिंगडामध्ये सुमारे 30 कॅलरीज असतात आणि खरबूजामध्ये 34 कॅलरीज असतात. पण खरबूज फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतं.
- खरबूजामध्ये कलिंगडापेक्षा व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळं खरबूज आपल्या डोळ्यांसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. खरबूजामध्ये पोटॅशियम जास्त असल्यानं ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही मदत करते.
advertisement
- कलिंगडात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणून हे शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही आणि कलिंगड खाल्ल्यानंतर आपलं शरीर थंड राहातं. कलिंगड खाल्ल्याने आपलं उष्माघातापासूनहि रक्षण होतं. कलिंगडात लायकोपीन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं. हे त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतं. यामध्ये त्यात एल-सिट्रुलिन नावाचं एक संयुगही असतं, जे व्यायामानंतर होणाऱ्या स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करतं.
advertisement
खरबूज पोषक तत्वांच्या बाबतीत जास्त फायदेशीर आहे. कारण त्यात फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. त्यात असलेले बीटा-कॅरोटीन दृष्टी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि खरबूज त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठीही फायदेशीर आहे.
- कलिंगडामध्ये मात्र पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. म्हणून ते रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर जास्त पाणी असल्याने ते शरीर हायड्रेटेडही ठेवतं.
advertisement
दोन्हींपैकी जास्त फायदेशीर कोणतं?
दोन्हींचे फायदे वाचून तुम्हाला कळलंच असेल की दोन्हीही चांगले आहेत. मात्र जर तुम्हाला फक्त शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवायचं असेल तर तुम्ही कलिंगड खायला हवं. पण जर तुम्हाला भरपूर पोषण हवं असेल, पचनक्रिया सुधारण्याची असेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही खरबूज खायला हवं. आता तुमच्या गरजेनुसार तुम्ही निवड करू शकता.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 3:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Watermelon Vs Muskmelon : उन्हाळ्यात कलिंगड खाणं चांगलं की खरबूज? 90% लोकांना माहित नसेल 'हा' महत्त्वाचा फरक







