advertisement

MI vs KKR : अजिंक्य रहाणेला चांगलाच माहितीये रोहित शर्माचा विक पाईंट! वानखेडेवर केकेआर तिथंच वार करणार

Last Updated:

Rohit sharma vs sunil narine battle : रोहितने नारायणच्या 177 बॉलचा सामना करताना केवळ 189 रन्स केल्या आहेत. विशेष म्हणजे, नारायणने रोहितला आतापर्यंत 10 वेळा आऊट केलं आहे.

Ajinkya Rahane knows weak point of Rohit sharma vs sunil narine
Ajinkya Rahane knows weak point of Rohit sharma vs sunil narine
Mumbai Indians vs Kolkata Night Riders : तब्बल पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळवला जाणार आहे. आयपीएल 2026 मधील हा दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माचा चांगला फॉर्म गेमचेंजर ठरू शकतो. पण रोहित शर्माला एकच बॉलर नडू शकतो, तो म्हणजे सुनील नारायण...

आतापर्यंत 10 वेळा आऊट केलंय

दोन्ही खेळाडूंमधील आतापर्यंतच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर सुनील नारायणचे वर्चस्व स्पष्टपणं दिसून येतंय. रोहित शर्माने नारायणच्या 177 बॉलचा सामना करताना केवळ 189 रन्स केल्या आहेत. विशेष म्हणजे, नारायणने रोहितला आतापर्यंत 10 वेळा आऊट केलं आहे. एका दिग्गज बॅटरला एकाच बॉलरने इतक्या वेळा बाद करणं, ही आकडेवारी रोहितच्या चिंतेत भर घालणारी आहे. तसेच मुंबईचं टेन्शन देखील यामुळे वाढलंय.
advertisement

रोहितचा स्ट्राईक रेट खूपच कमी

सुनील नारायणविरुद्ध खेळताना रोहितचा स्ट्राईक रेट खूपच कमी राहिलाय. हिटमॅनचा स्ट्राईक रेट केवळ 106.77 इतका राहिलाय. रोहितसारख्या आक्रमक बॅटरसाठी हा स्ट्राईक रेट अत्यंत कमी मानला जातो. नारायणच्या मिस्ट्री स्पिनसमोर रोहितला मोकळेपणाने हात उघडता आले नाहीत, हे या आकडेवारीवरून सिद्ध होतंय. तसेच त्याची सरासरी देखील 18.90 इतकी खाली घसरली आहे, जी त्याच्या एकूण कारकिर्दीच्या तुलनेत खूपच कमी आहे.
advertisement

नारायण पुन्हा बाजी मारणार?

दरम्यान, सुनील नारायणच्या चार ओव्हर मुंबई इंडियन्ससाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे मुंबई इंडियन्सला उर्वरित 16 ओव्हरमध्ये गेम चेंज करावा लागेल. कारण एका बाजूला हिटमॅनची ताकद असेल तर दुसऱ्या बाजूला नरीनची जादुई फिरकी. आता रोहित या रेकॉर्डमध्ये सुधारणा करणार की नारायण पुन्हा एकदा बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs KKR : अजिंक्य रहाणेला चांगलाच माहितीये रोहित शर्माचा विक पाईंट! वानखेडेवर केकेआर तिथंच वार करणार
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement