advertisement

Summer Recipe : शरीराला उन्हाचा त्रासच होणार नाही, फक्त प्या हे थंडगार नाचणीचं आंबील! झटपट होतं तयार

Last Updated:

नाचणी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आणि फायदेशीर असते. नाचणी आपण रोज मुलांनाही खायला दिली पाहिजे. अशावेळी तुम्ही टेस्टी आणि अतिशय हेल्दी नाचणीचं आंबील बनवू शकता.

झटपट आणि सोपी नाचणी आंबील
झटपट आणि सोपी नाचणी आंबील
मुंबई : उन्हाळयात आपल्याला थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण रोज आपण बाह्रेचे थंड ड्रिंक्स किंवा पदार्थ खाऊ शकता नाही. काहीवेळा आपल्याला मसाला ताक पिऊन पिऊनही बोअर होतं. अशावेळी तुम्ही काही टेस्टी आणि अतिशय हेल्दी बनवू शकता. ते म्हणजे नाचणीचं आंबील. हे आंबील बनवण्यासाठी तुम्हाला आंबवण्याची प्रोसेस करण्याची गरज नाही.
नाचणी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आणि फायदेशीर असते. नाचणी आपण रोज मुलांनाही खायला दिली पाहिजे. पण मुलं नाचणी खायला टाळाटाळ करतात. अशावेळी हे टेस्टी आंबील तुम्ही त्यांना प्यायला देऊ शकता. दुपारच्या कडक उन्हात या थंडगार आंबीलाची चव तुम्हाला खूप प्रसन्न करेल. ही रेसिपी reverseitwithshweta या इंस्टाग्राम अकाउंटवर दिली गेली आहे.
advertisement
नाचणीच्या बॅटरसाठी साहित्य..
- 2 टेबलस्पून नाचणीचं पीठ
- 1 कप दही
- मीठ, चवीनुसार
- 1 छोटा कांदा
- 1 टेबलस्पून कोथिंबीर
- पाणी
फोडणीसाठी लागणारं साहित्य..
- 1 टीस्पून तूप
- 1/2 टीस्पून मोहरी
- 1/2 टीस्पून जिरे
- 3/4 टीस्पून आलं
- 1 ते 2 हिरव्या मिरच्या
- कढीपत्ता
advertisement
असं बनवा झटपट नाचणीचं आंबील..
- सर्वात आधी 2 टेबलस्पून नाचणीचं पीठ आणि 3/4 कप पाणी एकत्र करून चांगले मिसळून घ्या.
- त्यानंतर एका पातेल्यात 2 कप पाणी गरम करा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात नाचणीच्या पिठाचे मिश्रण घाला.
- हे मिश्रण सततढवळत राहा, म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत
- 4 ते 5 मिनिटानंतर याचं थोडं घट्टसर बॅटर तयार होईल. हे बॅटर पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
advertisement
- आता एका भांड्यात दही आणि पाणी घेऊन ते चांगले घुसळून त्याचा ताक घ्या. तुम्ही डायरेक्ट ताकही वापरू शकता.
- या ताकामध्ये नाचणीचं थंड झालेलं बॅटर आणि मीठ घालून पुन्हा चांगलं घुसळून घ्या.
- आता या मिश्रणाला फोडणी देण्याची वेळ आहे. त्यासाठी एका गॅसवर तडका पॅन ठेवा.
- या तडका पॅनमध्ये तूप टाका. तूप गरम झाल्यावर त्यात जिरं, मोहरी, आलं, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून फोडणी बनवा.
advertisement
- ही तयार फोडणी ताकाच्या मिश्रणात टाका आणि सर्व काही व्यवस्थित एकत्र करा.
- तुमची इच्छा असल्यास तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू शकता. मात्र वरून कोथिंबीर नक्की घाला.
advertisement
हे नाचणीचं आंबील एक झटपट रेसिपी आहे. पण याचीही चव तुम्हाला उत्तमच लागेल. विशेष म्हणजे उन्हाळ्यात ताक तुम्हाला फ्रेश ठेवेल आणि नाचणी तुम्हाला ताकद देईल. म्हणून हे उन्हाळ्यात आरोग्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन आहे. एकदा नक्की ट्राय करा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Summer Recipe : शरीराला उन्हाचा त्रासच होणार नाही, फक्त प्या हे थंडगार नाचणीचं आंबील! झटपट होतं तयार
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement