advertisement

नितेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादीचा मुस्लिम आमदार भडकला, सगळंच काढलं

Last Updated:

राष्ट्रवादीचे आमदार इद्रीस नायकवाडी यांनी नितेश राणे यांच्या मुस्लिम समाजावरील टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे.

नितेश राणे-इद्रीस नायकवाडी
नितेश राणे-इद्रीस नायकवाडी
आसिफ मुरसल, प्रतिनिधी, सांगली : रमजानमध्ये हिंदूंना दुकान लावायला देतात का? कारण हिंदूंकडून विकत घेणे त्यांच्या धर्मात पाप आहे. मग धर्मनिरपेक्षता हिंदूनीच का पाळायची? असे वादग्रस्त विधान भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी केले. त्यांच्या याच विधानाचा समाचार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार इद्रीस नायकवाडी यांनी घेतला.

नितेश राणे यांना मुख्यमंत्री व्हायचंय?

नितेश राणे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी समज दिली आहे. त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणे वेगळी आहेत. आमचा शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आहे. फडणवीस सुद्धा कधी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही, अशा शब्दात आमदार नायकवाडी यांनी नितेश राणे यांच्यावर पलटवार केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याची सध्या शर्यत सुरू आहे. प्रखर टोकाची भूमिका घेऊन नितेश राणे यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडत आहेत, असेही नायकवाडी म्हणाले.
advertisement

वोट बँक तयार करून त्यांना सातत्याने भडकवायचा नितेश राणेंकडून उद्योग

काही लोकांना कशाच्या गोळ्या चालू आहेत, काही माहीत नाही. राजकारणासाठी एक वोट बँक तयार करायची आणि त्यांना भडकवायचे, असा उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. भारताच्या एकता अखंडातेला धक्का लावण्याचा प्रयत्न यातून होत आहे. समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करून हिंदू मुस्लिम वाद वादातून तरुणांना भडकावून आपण हिरो व्हायचा हाच यांचा उद्देश असल्याचे टीका नायकवाडी यांनी केली.
advertisement

आपण शपथ घेतलीये याचेही वाचाळवीरांना भान नाही

वाचाळवीरांना आपण कोणत्या पदावर आहोत, याचे सुद्धा भान राहिलेले नाही. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना गोपनीयतेची शपथ घेतली आहे, त्या शपथेचा त्यांनी भंग केला आहे, असे नायकवाडी म्हणाले.

नितेश राणे यांचे मुस्लीम समाजावर वादग्रस्त वक्तव्य

सर्वधर्म समभावाचं कॉन्ट्रॅक्ट फक्त हिंदूंनीच घेतलंय का? असा सवाल विचारीत रमजान काळात हिंदूंना दुकान लावायला देतात का? असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले. नाशिकमधील कुंभमेळ्यात किंवा हिंदूंच्या पवित्र उत्सवांमध्ये फक्त हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नितेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादीचा मुस्लिम आमदार भडकला, सगळंच काढलं
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement