Mumbai Traffic Advisory: मुंबईतील IPL च्या सामन्याआधी स्टेडियम परिसरात ट्रॅफिक अलर्ट, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2026 चा दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यापूर्वी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ट्रॅफिक अलर्ट जारी केला.
मुंबई: आयपीएल 2026 चा दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आजच्या सामन्यापूर्वी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण ट्रॅफिक अलर्ट जारी केला आहे. हा सामना वानखेडे स्टेडियममध्ये संध्याकाळी 7.30 वाजता होणार असून, गेट्स दुपारी 4 वाजता उघडण्यात येणार आहेत. हजारो प्रेक्षकांच्या गर्दीमुळे मरीन ड्राइव्ह आणि आजूबाजूच्या परिसरात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई वाहतुक पोलिसांनी मुंबईकरांना पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींनुसार पोलीस उपायुक्त (वाहतूक-दक्षिण) प्रशांत परदेशी यांनी वाहतुकीचे नियम जारी केले आहेत. आवश्यकतेनुसार सामन्याच्या दिवशी वाहतुक सेवा उपलब्ध केली जाणार आहे. वाहतुक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना पूर्वनियोजन करून पर्यायी मार्ग निवडण्याचा सल्ला दिला आहे. हे अलर्ट सोशल मीडियावर (X, पूर्वी ट्विटर) प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता होऊ शकतो, म्हणून पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्यासाठी सांगितले आहे. मुंबई इंडियन्सचे 7 सामने मुंबईच्या वानखे़डे स्टेडियमवर खेळवले जाणार आहे. कोणकोणत्या दिवशी हे क्रिकेटचे सामने आहेत, जाणून घेऊया...
advertisement
कोणकोणत्या दिवशी मुंबई इंडियन्सचे सामने आहेत-
29 मार्च- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (संध्याकाळी 07:30)
12 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (संध्याकाळी 07:30)
16 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (संध्याकाळी 07:30)
23 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (संध्याकाळी 07:30)
29 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (संध्याकाळी 07:30)
advertisement
4 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (संध्याकाळी 07:30)
24 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 03:30)
या क्रिकेट सामन्यांदरम्यान, चर्चगेट आणि मरिन ड्राईव्ह या रेल्वे स्थानक परिसरामध्ये क्रिकेट फॅन्सची मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि वाहनांची वर्दळ होण्याची शक्यता आहे. स्टेडियममध्ये पार्किंगची सोय उपलब्ध नसल्यामुळे वाहतूक पोलीस अधिकार्यांनी क्रिकेटच्या फॅन्सला उपनगरीय रेल्वे आणि मेट्रो सेवांसह सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. स्टेडियम शेजारी असलेल्या परिसरातील अनेक रस्त्यांवर पार्किंगवर निर्बंध असणार आहेत. ज्यामध्ये C Road, D Road, E Road, F Road आणि G Road चा संपूर्ण परिसर, एन.एस. रोड (मफतलाल बाथ सिग्नलपासून एअर इंडिया जंक्शनपर्यंतचा परिसर), वीर नरीमन रोड (चर्चगेट ते सुंदर महल जंक्शनपर्यंत) या रस्त्यांचा समावेश आहे.
advertisement
याव्यतिरिक्त, 'पे-अँड-पार्क' सुविधा ज्या दिवशी क्रिकेटचा सामना आहे, त्या दिवशी वीर नरिमन रोड आणि आय.एम.सी. मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग सुविधा नसणार आहे. त्या मार्गांवर वाहतूक एकेरी मार्गानेच केली जाणार आहे. वाहतूक सुव्यवस्थित करण्यासाठी डी रोड एनएस रोडकडून ई आणि सी रोडच्या दिशेने एकमार्गी (पश्चिम ते पूर्व) राहील. ई रोड डी रोडकडून सी रोडच्या दिशेने एकमार्गी (दक्षिण दिशेने) राहील. नेताजी सुभाषचंद्र बोस रोड (निवडक भाग), कोस्टल रोड (आवश्यकतेनुसार दोन्ही दिशांनी) आणि मरीन ड्राईव्ह, वरळी आणि ताडदेव दरम्यानचे रोड या मार्गांवर तात्पुरती वाहतूक बंदी लागू केली जाऊ शकते. प्रवाशांसाठी महर्षी कर्वे रोड, चर्नी रोड, ऑपेरा हाऊस आणि पेडर रोड मार्गे प्रवासासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 3:21 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Traffic Advisory: मुंबईतील IPL च्या सामन्याआधी स्टेडियम परिसरात ट्रॅफिक अलर्ट, पर्यायी मार्ग कोणते?







