advertisement

12 टन किटकॅट चॉकलेटची चोरी, अक्खा ट्रक गायब केला; कंपनीकडून दरोडेखोरांचे कौतुक, पण 4 लाख KitKat बार गेले कुठे?

Last Updated:

KitKat Chocolate: युरोपमध्ये 12 टन किटकॅट चॉकलेटने भरलेला ट्रक चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मध्य इटलीतून निघालेला हा ट्रक पोलंडला पोहोचण्याआधीच रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला आहे.

News18
News18
झुरिच: स्विसमधील नेस्लेने (Nestle) शनिवारी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात युरोपमध्ये एका ट्रकची चोरी झाली असून त्यात तब्बल 12 टन किटकॅट चॉकलेटचे बार होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार किटकॅटच्या नवीन रेंजचे 4,13,793 चॉकलेट बार घेऊन हा ट्रक मध्य इटलीतून युरोपभर वितरणासाठी निघाला होता. मात्र हा ट्रक पोलंडमधील आपल्या नियोजित ठिकाणी कधीच पोहोचला नाही.
तो ट्रक आणि त्यातील माल अजूनही बेपत्ता आहे. हा ट्रक नेमका कोठून गायब झाला, याची माहिती नेस्लेने जाहीर केलेली नाही.
एका वेगळ्या निवेदनात किटकॅटने म्हटले आहे की हे चोरीला गेलेले चॉकलेट बार त्यांच्यावरील 'बॅच कोड'मुळे ओळखता येऊ शकतात. जर कोणी चोरीला गेलेल्या चॉकलेटचा बॅच नंबर स्कॅन केला, तर त्यांना किटकॅटशी संपर्क कसा साधायचा याच्या सूचना मिळतील.
advertisement
गुन्हेगारांच्या चवीची (निवडीची) आम्ही प्रशंसा करत असलो, तरी मालाची चोरी ही सर्व प्रकारच्या उद्योगांसाठी एक वाढती गंभीर समस्या आहे, हे वास्तव आहे असे स्विस फूड अँड बेव्हरेज कंपनी नेस्लेने म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
12 टन किटकॅट चॉकलेटची चोरी, अक्खा ट्रक गायब केला; कंपनीकडून दरोडेखोरांचे कौतुक, पण 4 लाख KitKat बार गेले कुठे?
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement