advertisement

IPL 2026 : '$#@ ना तूप पचत नाही अन् तुला...', आयपीएलच्या पहिल्याच सामन्यानंतर राडा, कॉमेंट्रीवरून हरभजन भडकला!

Last Updated:

आयपीएल 2026 चा पहिला सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झाला, पण या सामन्यातल्या हिंदी कॉमेंट्रीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

'$#@ ना तूप पचत नाही अन् तुला...', आयपीएलच्या पहिल्याच सामन्यानंतर राडा, कॉमेंट्रीवरून हरभजन भडकला!
'$#@ ना तूप पचत नाही अन् तुला...', आयपीएलच्या पहिल्याच सामन्यानंतर राडा, कॉमेंट्रीवरून हरभजन भडकला!
बंगळुरू : आयपीएल 2026 चा पहिला सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झाला, या सामन्यात आरसीबीचा अगदी सहज विजय झाला, पण भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग हा त्याच्या कॉमेंट्रीवरून चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. हरभजन सिंगच्या कॉमेंट्रीवर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. सोशल मीडियावरची ही टीका पाहून हरभजन सिंगही भडकला असून त्याने चाहत्यांवर टीकास्त्र डागलं आहे.
आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या सामन्यादरम्यान हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कॉमेंट्रीवर एका क्रिकेट ीम अकाऊंटने टीका केली. भारतीय कॉमेंटेटर आणि इंग्रजी कॉमेंटेटर इयन बिशप यांच्या कॉमेंट्रीची तुलना केली गेली.
हरभजन सिंग याला ही टीका आवडली नाही आणि त्याने कुत्रा म्हणत भडकाऊ वक्तव्य केलं. 'बाजारातून हत्ती चालतो तेव्हा कुत्रे हजारवेळा भुंकतात', असा पलटवार हरभजन सिंगने केला, तसंच त्याने युझरला गप्प बसून निघून जायलाही सांगितलं.
advertisement
हरभजनने प्रत्युत्तर दिल्यानंतर मीम पेजने हरभजन आणि आर.अश्विन यांच्यातल्या जुन्या वादाचा मुद्दा उपस्थित केला. मत्सरामुळे हरभजनची कारकीर्द संपली आता त्याच्या कॉमेंट्रीच्या कारकिर्दीचीही तशीच गत होईल, असं युजर म्हणाला.
मीम पेजवरून करण्यात आलेल्या या टिप्पणीमुळे हरभजन सिंगचा पारा आणखी चढला. 'कुत्र्यांना तूप पचत नाही आणि तुझ्यासारख्या लुझरला हे उत्तर सहन होत नाही, चालता हो टॉमी', असं हरभजन सिंगने लिहिलं.
advertisement
या वादानंतरही सोशल मीडियावर अशाच प्रकारच्या कमेंट्सची लाट उसळली. तरीही हरभजनने ट्रोलर्सना प्रत्युत्तर देणं सुरूच ठेवलं. अशाच एका पोस्टमध्ये सेहवाग, आकाश चोप्रा आणि हरभजन यांचा उल्लेख तीन विदूषक असा केला गेला, त्यावर हरभजनने त्या दोघांपैकी एकाला तुझे वडील म्हणून निवड, असं हरभजन म्हणाला.
हरभजन सिंगचं हे वागणं आणि त्याची भाषा आक्षेपार्ह असून त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्याची आयपीएलच्या कॉमेंट्रीमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी काही चाहत्यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : '$#@ ना तूप पचत नाही अन् तुला...', आयपीएलच्या पहिल्याच सामन्यानंतर राडा, कॉमेंट्रीवरून हरभजन भडकला!
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement