advertisement

14 लाख भरून नोकरी, नंतर कारण न देता संस्थेने कामावरून काढलं, शिक्षिकेने थेट मरणाची परवानगी मागितली

Last Updated:

बीडमधील एका महिला शिक्षिकेने जिल्हाधिकांऱ्याकडे कुटुंबासह स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.

बीड शिक्षिकेचे आमरण उपोषण
बीड शिक्षिकेचे आमरण उपोषण
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : शिक्षण संस्थेच्या मनमानी जाचाला कंटाळून महिला शिक्षिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. बीड जिल्हा परिषदेसमोर गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू असून न्याय मिळविण्यासाठी त्यांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. बीडच्या आंबेजोगाई येथील फातिमा उर्दू माध्यमिक शाळेच्या सहशिक्षिका नाझिया बेग नूरुल हसन यांनी अशी परवानगी मागत बीड जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
नाझिया बेग नूरुल हसन यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. संस्थाचालकाने 14 लाख रूपये घेऊन त्यांना शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नियुक्ती दिली. मात्र त्यानंतर 2019 मध्ये काहीही कारण न दाखवता शाळेतून कमी केले. तसेच त्या जागी नव्याने दुसरे व्यक्ती भरण्यात आली.

शिक्षिकेच्या मागणीमुळे शिक्षण विभागात खळबळ

या विरोधात अनेक वेळा तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने तसेच संस्थाचालक वारंवार धमकी देत असल्याने नाझिया बेग यांनी हे आमरण उपोषण सुरू केले असून कुटुंबासह स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे खळबळ असून शिक्षण विभाग आणि शिक्षण संस्थेमधील कारभार चव्हाट्यावर आला आहे.
advertisement

शिक्षण संस्थेचे नेमके काय म्हणणे आहे?

दुसरीकडे शिक्षण संस्थेची बाजू जाणून घेण्याकरिता आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. परंतु आम्हाला त्यावरती काहीही बोलायचे नाही, आम्ही त्यांना कायदेशीर उत्तर देऊ, असे शिक्षण संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

पीडितेचे काय म्हणणे आहे?

२० किंवा ४० टक्क्यावर पगार सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग माध्यमिक, जिल्हा परिषद बीड या कार्यालयातील खालच्या अधिकाऱ्यापासून ते वरच्या अधिकाऱ्यापर्यंत एकूण ४ लाख रूपये दिल्याशिवाय तुझे पगाराबाबतचे प्रस्ताव घेण्यास स्पष्ट नकार देत असून तात्काळ रक्कम जमा करा अन्यथा तू मेलीस तरी तुझा पगार कधीच सुरू होऊ शकत नाही, असे कोहिनूर मागासवर्गीय एज्युकेशन आणि वेलफेअर सोसायटी संचलित, फातिमा उर्दू माध्यमिक शाळा, गांधीनगर, गुरुवारपेठ, अंबाजोगाई, या संस्था आणि शाळा व्यवस्थापनाकडून मला वेळोवेळी सांगण्यात येत असून या मानसिक त्रासापोटी माझ्याकडे सहकुटुंब आत्महत्या केल्याशिवाय कोणतेही पर्याय नाही. त्यामुळे कुटुंबाला इच्छा मरणाची परवानगी मिळावी, असे निवेदन शिक्षिकेने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
14 लाख भरून नोकरी, नंतर कारण न देता संस्थेने कामावरून काढलं, शिक्षिकेने थेट मरणाची परवानगी मागितली
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement