Maharashtra Kesari : रिलस्टार कुस्तीपटूचा युटर्न! काही तासात निवृत्ती घेतली मागे, कारणही स्वत:च सांगितलं, VIDE0
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कुस्तीपटू सोनाली मंडलिकने पराभवानंतर तडताफडकी निवृत्ती जाहीर केली होती.पण या घटनेच्या 24 तासातच तिने आता युटर्न घेत निवृत्ती मागे घेतली आहे. या संदर्भात कारण देखील तिने सोशल मीडियावर सांगितलं आहे.
Maharashtra Kesari Sonali Mandlik : प्रीतम पंडीत, प्रतिनिधी,सोलापूर : सोलापुरातील हरीभाई प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 4च्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनल लढतीच्या दिवशी रिलस्टार कुस्तीपटू सोनाली मंडलिकने पराभवानंतर तडताफडकी निवृत्ती जाहीर केली होती.पण या घटनेच्या 24 तासातच तिने आता युटर्न घेत निवृत्ती मागे घेतली आहे. या संदर्भात कारण देखील तिने सोशल मीडियावर सांगितलं आहे.त्यामुळे या घटनेने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सोलापुरातील हरीभाई प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 4 थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ओपनमध्ये निवड न झाल्यामुळे अहिल्यानगरची रीलस्टार कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने कुस्तीला अखेरचा रामराम ठोकला होता. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून या संदर्भातली घोषणा केली होती.
सोलापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ओपन गटात निवड होऊ न शकल्यामुळे नाराज झालेल्या सोनाली मंडलिकने तातडीने सोलापूर सोडले आणि सोशल मीडियावर रडत रडत कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती.पहिल्या दिवशी अपेक्षा पाटील हिच्याकडून सोनाली हिला पराभवाचा धक्का बसला. त्यांनतर स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर तिने अश्रूंना वाट मोकळी करत आपण आर्थिक अडचणीमुळे, स्पॉन्सरशीप, खुराक मिळू न शकल्यामुळे तसेच ओपनला खेळण्यासाठी 65 च्या पुढे वजन न वाढल्यामुळे आपणास स्पर्धेतून बाहेर पडावे लागले असल्याची खंत बोलून दाखवली होती.
advertisement
advertisement
निवृत्ती मागे का घेतली?
या निवृत्तीच्या 24 तासानंतर तिने तो व्हिडिओ डिलिट केला आहे. आणि एक नवीन व्हिडिओ शेअर करत निवृत्ती मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.
काल मी एक व्हिडिओ टाकलेला ज्यामध्ये मी पराभवामुळे कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी भावनेच्या भरात तो निर्णय घेतला होता. मी त्यावेळेस खुप इमोशनल झाले होते. कारण तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा माझ्याकडून होत्या,त्या मी पुर्ण करू शकली नव्हती.पण तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. तू हार किंवा जिंक आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. मी कमेंट बॉक्सदेखील वाचला. मला सगळ्यांनी खूप पाठिंबा दिला. तसेच मला माझ्या आईने वडिलांनी आणि सरांनी मला खूप समजावून सांगितले.त्यामुळे मी कुस्ती सोडणार नाही,असे सांगत तिने निवृत्ती मागे घेतली आहे.
advertisement
कोण आहे सोनाली मंडलिक
दरम्यान सोनाली मंडलिक ही अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील एक प्रतिभावंत महिला कुस्तीपटू आहे. खेलो इंडियामध्ये तिनं सुवर्ण पदक पटकावले आहे. सोनाली मंडलिकनं अत्यंत कठीण परिस्थितीतून कोणत्याही साधनांशिवाय पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या तालमीमध्ये कुस्तीला सुरुवात केली. ओतूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत तिनं चांदीची गदा आणि रोख पुरस्कार जिंकला. सोनाली हिच्या कुस्तीमुळं आदर्श घेऊन अनेक महिला कुस्तीपटूंनी राज्यभरात नाव मिळवलं आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 5:32 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari : रिलस्टार कुस्तीपटूचा युटर्न! काही तासात निवृत्ती घेतली मागे, कारणही स्वत:च सांगितलं, VIDE0









