वाशिम हादरलं! राहत्या घराच्या अंगणातच अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मध्यरात्रीच्या घटनेने खळबळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
खानापूर गावातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने बळजबरीने अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. खानापूर गावातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने बळजबरीने अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेनंतर ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर चिंता व्यक्त केली जात आहे.
वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील खानापूर गावात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 28 मार्चच्या मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारंजा ग्रामीण पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शेजारील गावातील 19 वर्षीय तरुण 28 मार्चच्या रात्री पीडित मुलीला भेटण्यासाठी खानापूर येथे आला होता. रात्री 11 वाजेच्या सुमारास मुलीचे वडील आणि भाऊ झोपेतून जागे झाले असता त्यांना मुलगी खोलीत दिसली नाही. संशय आल्याने त्यांनी घराच्या परिसरात शोध घेतला असता, घराच्या अंगणातच मुलगी आणि तो तरुण आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. वडिलांनी आरडाओरडा करताच तो तरुण तिथून अंधाराचा फायदा घेत पळून गेला.
advertisement
फरार आरोपीला गावातून उचलले
पळून गेलेला तरुण ओळखीचा असल्याचे आणि तो केवळ भेटीसाठी आला होता. मात्र त्याने आपल्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केल्याचे पीडित मुलीने आपल्या वडिलांना रडत सांगितले. या घटनेने हादरलेल्या वडिलांनी तात्काळ कारंजा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पथके रवाना केली आणि आरोपीला त्याच्या गावातून उचलले.
advertisement
आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
कारंजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध आता कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत असून एवढ्या रात्री तरुणी मुलीच्या घरी का आला? याचा शोध घेत आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 5:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाशिम हादरलं! राहत्या घराच्या अंगणातच अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मध्यरात्रीच्या घटनेने खळबळ







