Chest Pain Causes : छातीत दुखणं फक्त हार्ट अटॅकचे संकेत नाही! तज्ज्ञ म्हणाले, असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
अनेकांना छातीत दुखायला लागलं की हृदयविकाराच्या झटक्याची भीती वाटू लागते. परंतु हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की, छातीतील प्रत्येक वेदना ही हृदयाशी संबंधित नसते.
मुंबई : छातीत दुखणं हे अनेकदा गंभीर ठरू शकतं. त्यामुळंच अनेकांना छातीत दुखायला लागलं की हृदयविकाराच्या झटक्याची भीती वाटू लागते. परंतु हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की, छातीतील प्रत्येक वेदना ही हृदयाशी संबंधित नसते. काही वेळा ती फुफ्फुस किंवा पचनसंस्थेशी संबंधित देखील असण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुमच्या छातीत अधून मधून दुखत असेल किंवा वेदना जाणवत असततील तर ते फक्त हृदयाशी संबंधित नसून इतर कारणांमुळं देखील होऊ शकतं हे लक्षात टेठा. परंतु छातत होणाऱ्या कोणत्याही वेदनांकडं दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
यासंदर्भात एबीपी न्यूजने डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, छातीत दुखणं म्हणजे छातीच्या मध्यभागी जडपणा किंवा दाब जाणवणं अशा वेदना हात, जबडा किंवा पाठीपर्यंत पसरू शकतात. तसेच यामुळं घाम येणं, मळमळ किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणं देखील दिसू शकतात. शारीरिक हालचालींदरम्यान या वेदना वाढू शकतात. अशा परिस्थितीत तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.
advertisement
फुफ्फुसाचे आजारांमुळे छातीत दुखू शकतं
छातीत दुखण्याचं कारण फुफ्फुसाचे आजार देखील असू शकतात. परंतु त्या वेदना थोड्या वेगळ्या जाणवतात. फुफ्फुसाच्या आजारामुळं होणाऱ्या वेदना अनेकदा तीव्र आणि टोचणाऱ्या असतात. तसेच खोल श्वास घेताना, खोकलताना किंवा हालचाल केल्यास त्या वेदना वाढतात. फुफ्फुसं दुखण्याच्या सामान्य कारणांमध्ये ताप, खोकला आणि छातीत दुखणं या लक्षणांचा समावेश असतो. याशिवाय फुफ्फुसांच्या आवरणावर सूज येऊ शकते आणि त्यामुळं श्वास घेताना तीव्र वेदना होऊ शकतात. पल्मोनरी एम्बोलिझममुळं धाप लागण्यासोबतच अचानक तीव्र वेदना देखील जाणवू शकतात.
advertisement
दीर्घकालीन श्वसन रोगही असू शकतो कारण
याशिवाय श्वसनाशी संबंधीत दीर्घकालीन आजारामुळं देखील छातीत सतत अस्वस्थता, दुखणं आणि श्वास घेण्यास अडचण येऊ शकते. तज्ञांच्या मते, फुफ्फुसांच्या आजाराचं निदान उशिरा झाल्यास श्वासोच्छवासाच्या गंभीर समस्या, संसर्ग किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे छातीत दुखण्याच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष न करण्याचा सलाल डॉक्टर देतात.
पचनसंस्थेशी संबंधित असू शकतात वेदना
छातीत दुखणं हे काहीवेळा पचनसंस्थेशी संबंधित असू शकतं आणि ते अगदी हृदयाच्या दुखण्यासारखं तुम्हाला भासू शकतं. पंरतु छातीतील पचनसंस्थेशी संबंधित वेदना या गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीजमुळं होऊ शकतात. यामुळं अनेकदा जेवणानंतर किंवा झोपल्यावर छातीत जळजळ किंवा सौम्य वेदना जाणवू शकतात. याशिवाय अन्ननलिकेतील आकुंचनामुळं अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू शकते. आम्ल वाढल्यास जळजळ किंवा छातीत दाबल्यासारखी वेदना होऊ शकते.
advertisement
कोणत्या प्रकारच्या वेदनेचा काय अर्थ?
तज्ञांच्या मते, छातीत जाणवणाऱ्या सर्वच वेदना या गंभीर नसतात. कधीकधी स्नायूंचा ताण, बरगडीला झालेली इजा किंवा सततची चिंता यामुळं देखील छातीत वेदाना होऊ शकतात. परंरतु अशा प्रकरणांमध्ये वेदना सहसा एकाच ठिकाणी जाणवते. डॉक्टरांच्या मते, काही विशिष्ट लक्षणांवरून तुम्हाला या वेदनांचे कारण ओळखता येऊ शकते. छातीतील दाबल्यासारखी किंवा पसरलेली वेदना हृदयाशी संबंधित असू शकते, श्वास घेताना किंवा हालचाल करताना वाढणारी वेदना फुफ्फुसांशी संबंधित असू शकते तसेच जळजळणारी वेदना सामान्यपणे जेवणानंतर होऊ शकते किंवा ती पोटाशी संबंधित असण्याची शक्यता असते.
advertisement
dr_arvind.kumar या इंस्टाग्राम हॅण्डलवरही याबद्दल आणखी माहिती दिली गेली आहे.
advertisement
तीव्र वेदानांमध्ये कायम डॉक्टरांचा सल्ला घ्या
डॉक्टरांनी असेही सांगितले की, छातीतील तीव्र वेदनेबद्दल कधीही अंदाज लावून त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ते हृदयाशी संबंधीत असेल तर धोकादायक देखील ठरू शकते. अशावेळी नेमकं कारण जाणून गेण्यासाठी तात्काळ तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण लक्षणं अनेकदा सारखी वाटू शकतात. परंतु तुम्ही वेळीच उपचार घेतले तर पुढील समस्या आणि धोका टाळता येऊ शकतो.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 4:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Chest Pain Causes : छातीत दुखणं फक्त हार्ट अटॅकचे संकेत नाही! तज्ज्ञ म्हणाले, असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण





