Mumbai News: यंदाही नालेसफाईच्या कामाला उशीर, मुंबईत पूर टाळण्यासाठी BMC अॅक्शन मोडमध्ये; डेडलाईन किती?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
बीएमसीच्या आयुक्तांनी शहरातील नाले आणि नदीतून गाळ काढण्याच्या कामांना गती दिली असून कंत्राटदारांना कामाची डेडलाईन दिली आहे.
मुंबई: पावसाळ्यासाठी दोन महिने शिल्लक असताना अजूनही मुंबईतील नालेसफाई झालेली नाही. अजूनही नालेसफाईंच्या कामाला वेग आलेला नाही. आता अशातच महानगरपालिका आयुक्त भुषण गगरानी यांनी शहरातील मोठे नाले आणि मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामांना गती दिली असून, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकार्यांना आगामी मान्सूनमध्ये पाणी साचू नये, यासाठी कामांना युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.
वॉर्ड आणि विभागांमधील गाळ काढण्याच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेताना, गगरानी यांनी कामांचे योग्य नियोजनावर भर दिला आहे. त्यांनी निर्देश दिले की, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी भरण्याची समस्या जाणवू नये, यासाठी नाल्यांमधून काढलेला गाळ दोन दिवसांच्या आत नियोजित ठिकाणी नेऊन त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यासोबतचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगत आयुक्तांनी अधिकार्यांना व्यवस्थित एकत्रित रित्या कामाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहे. नाले आणि नदीवर तरंगणारा कचरा अडवण्यासाठी आणि तो समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी, 14 निश्चित ठिकाणी बीएसमीने 'ट्रॅश बूम्स' तैनात करण्यावरही भर दिला आहे.
advertisement
महापालिकेला नालेसफाईच्या कामाबद्दल दररोज माहिती कळवण्यासाठी आयुक्तांनी लोक प्रतिनिधींना आणि प्रभाग समिती अध्यक्षांना निर्देश दिले आहेत. तसेच, प्रत्यक्ष अंमलबजावणीचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत संयुक्त पाहणी दौरे करावेत, असेही त्यांनी निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर आणि मुख्य अभियंता कल्पना राऊत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, तसेच विभागीय आणि प्रभाग स्तरावरील अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित होते. आयुक्तांनी सांगितले की, मुंबईच्या तीनही प्रशासकीय विभागांमध्ये शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरामध्ये गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.
advertisement
आयुक्तांनी अशीही घोषणा केली की, मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. मुदतीचे पालन करण्यासाठी कामाला गती वाढवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मोगरा नाला, माजस नाला, मानखुर्द नाला, सोमैया नाला, वाकोला नाला आणि दादर-धारावी नाला यांसारख्या महत्त्वाच्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे. पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी या ठिकाणी यंत्रसामग्री आणि कचरा अडवणारी मशिन (ट्रॅश बूम्स) तैनात करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. महापालिकेने गाळ काढणे, नाले आणि रेल्वे शेजारी असणारे नाले रुंद करणे, त्यांची स्वच्छता करणे, यासह, पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या नाल्यांशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी 31 मे 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
advertisement
अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होण्यासाठी आणि पूर टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणी पंप बसवण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पारदर्शकता वाढवण्यासाठी, बीएमसीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक डिजिटल डॅशबोर्ड सुरू केला आहे, जिथे नागरिकांना त्यांच्या परिसरातील कामांचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळू शकतात. याव्यतिरिक्त, पालिका गाळ काढण्याच्या कामाच्या व्हिडिओंचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा वापर केला जाणार आहे. दरम्यान, यावर्षी बीएमसीने कामांसाठी नवीन कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. कामाची कार्यक्षम आणि वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्याशी मजबूत समन्वय साधण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 4:45 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: यंदाही नालेसफाईच्या कामाला उशीर, मुंबईत पूर टाळण्यासाठी BMC अॅक्शन मोडमध्ये; डेडलाईन किती?








