Ricky Pointing : वर्ल्ड कप फायनलच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती? प्रश्न ऐकून पॉन्टिंग भडकला, थेट बॅट उगारली, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
2003 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने कर्णधार रिकी पॉन्टिंगचं वादळी नाबाद शतकाच्या जोरावर मोठा स्कोअर उभारला.
मुंबई : 2003 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने कर्णधार रिकी पॉन्टिंगचं वादळी नाबाद शतक तसंच ऍडम गिलख्रिस्ट आणि डॅमियन मार्टिन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 359/2 पर्यंत मजल मारली. रिकी पॉन्टिंगने 121 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने नाबाद 140 रन केले. तर डॅमियन मार्टिनने नाबाद 88 आणि गिलख्रिस्टने 57 रनची खेळी केली.
रिकी पॉन्टिंगच्या या मॅच विनिंग खेळीबद्दल त्याला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, पण पॉन्टिंगच्या या खेळीनंतर भारतामध्ये नवा वाद निर्माण झाला होता. रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती, अशा अफवा भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये पसरल्या होत्या.
पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग?
2003 वर्ल्ड कपच्या 23 वर्षांनंतर रिकी पॉन्टिंगला बॅटमध्ये स्प्रिंग होती का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रिकी पॉन्टिंग संतापला आणि त्याने थेट बॅटच उगारली. पंजाब किंग्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 359 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 234 रनवर ऑलआऊट झाला होता. विरेंद्र सेहवागने 82, राहुल द्रविडने 47, गांगुली आणि युवराजने प्रत्येकी 24-24 रनची खेळी केली होती.
advertisement
advertisement
रिकी पॉन्टिंग हा पंजाब किंग्सचा प्रशिक्षक असून तो सध्या आयपीएल 2026 साठी भारतात आहे. पंजाब किंग्सचं नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. श्रेयस अय्यर आणि रिकी पॉन्टिंगच्या जोडीने पंजाब किंग्सला मागच्या मोसमात आयपीएल फायनलमध्ये पोहोचवलं होतं, पण आरसीबीविरुद्ध फायनलमध्ये पंजाबला पराभवाचा धक्का बसला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 5:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ricky Pointing : वर्ल्ड कप फायनलच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती? प्रश्न ऐकून पॉन्टिंग भडकला, थेट बॅट उगारली, Video







