Aajache Rashibhavishya: पैसा येणार, विवाह जुळणार, मंगळवारी ‘या’ राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Daily Horoscope: आजचा मंगळवार मेष ते मीन राशींसाठी खास असेल. तुमच्या नशिबात काय आहे? हे आजचं राशीभविष्यच्या माध्यमातून ज्योतिषी समीर जोशी यांच्याकडून जाणून घेऊ.
मेष राशी - मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल आणि आश्चर्य वाटेल. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
वृषभ राशी - क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आज कुणी विपरीत लिंगीच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज कुणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. कोणा तिसऱ्याने कान फुंकल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
कर्क राशी - कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. आज विदेशात राहणाऱ्या कुणी व्यक्तीकडून तुम्हाला काही वाईट वार्ता मिळू शकते. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
सिंह राशी - तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभवती असलेल्या लोकांना प्रभावित करील. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे. सहकाऱ्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. तुमचा शुभ अंक आज 6 असणार आहे.
advertisement
कन्या राशी - महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. आनंद तुमच्यामध्ये लपलेला आहे आज फक्त तुम्हाला आपल्या मध्ये डोकावण्याची आवश्यकता आहे. आजचा दिवस थोडा कष्टाचा आहे. मात्र दिवस शुभ असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
तुळ राशी - आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते. दिवस उत्तम आहे आज तुमचा प्रिय तुमच्या कुठल्या गोष्टीवर खूप आणि मनमोकळा हसेल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ताऱ्यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
धनु राशी - नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका विचार न करता कुणाला ही आपला पैसा देऊ नका तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
मकर राशी - आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. अविवाहित मंडळींना आज आनंदाची बातमी लाभेल. कुणाचा साथ न मिळवता आजच्या दिवशी तुम्ही भरपूर आनंद मिळवू शकाल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
मीन राशी- संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. ज्या लोकांनी अतीत मध्ये आपली धन गुंतवणूक केली होती आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement








