अरे वाह! शनि साडेसाती असणाऱ्यांना मोठा दिलासा, जानेवारी महिना अखेर 'या' राशींना होणार धनलाभ
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे वर्ष ग्रहांच्या हालचालींमुळे विशेष ठरणार आहे.
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे वर्ष ग्रहांच्या हालचालींमुळे विशेष ठरणार आहे. या वर्षात शनिदेवाच्या प्रभावामुळे काही राशींना साडेसातीचा काळ अनुभवायला मिळत असला, तरी त्याच वेळी निर्माण होणारे अनेक शुभ राजयोग या राशींसाठी दिलासादायक ठरणार आहेत. सध्या मेष, कुंभ आणि मीन या तीन राशींवर शनिची साडेसाती सुरू आहे. मात्र मकर राशीत होणाऱ्या ग्रहयोगांमुळे या साडेसातीचा परिणाम काही अंशी सौम्य होताना दिसेल.
ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीत एकाच वेळी चार ग्रह एकत्र येत असून त्यामुळे तब्बल पाच महत्त्वाचे राजयोग तयार होत आहेत. बुध आणि सूर्य यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे. त्याचबरोबर शुभ बुधाच्या प्रभावामुळे लक्ष्मी नारायण राजयोग, तर सूर्य आणि शुक्र यांच्या संयोगाने शुक्रादित्य राजयोग जुळून येत आहे. याशिवाय रुचक राजयोग आणि मंगलादित्य राजयोगही सक्रिय होत आहेत. या सर्व राजयोगांचा सकारात्मक प्रभाव साडेसातीचा काळ सुरू असलेल्या राशींवरही दिसून येणार आहे.
advertisement
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. या काळात मानसिक तणाव आणि कामातील अडथळे जाणवू शकतात. मात्र मकर राशीत तयार होणारे पाच राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतील आणि नोकरी किंवा व्यवसायात स्थैर्य येण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत राहील, रखडलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. समाजात आणि कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असून अभ्यासात एकाग्रता वाढेल.
advertisement
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या राशीचा स्वामी ग्रह शनि असल्याने या काळात आलेल्या अनुभवांचा मोठा फायदा भविष्यात होणार आहे. पाच ग्रहांच्या युतीमुळे आतापर्यंत भेडसावणाऱ्या अडचणी अचानक कमी होतील. मेहनतीचे योग्य फळ मिळू लागेल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. याशिवाय धार्मिक कार्यात सहभाग वाढेल आणि एखाद्या तीर्थयात्रेचा योगही जुळून येऊ शकतो.
advertisement
मीन रास
मीन राशीच्या लोकांवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असल्याने हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. जबाबदाऱ्या वाढतील आणि संयमाची गरज भासेल. मात्र पाच शुभ राजयोगांच्या प्रभावामुळे आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीत पदोन्नती किंवा व्यवसायात विस्ताराचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि घरात शुभ कार्याची शक्यता नाकारता येणार नाही.
advertisement
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 6:55 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
अरे वाह! शनि साडेसाती असणाऱ्यांना मोठा दिलासा, जानेवारी महिना अखेर 'या' राशींना होणार धनलाभ









